डोक्यात वार करून तरुणाचा खून; दोन संशयित ताब्यात File Photo
अहिल्यानगर

Crime News : ‘त्या’ तरुणाचा गळा आवळून खून

नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नगर : नगर- पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन केल्यानंतर त्या तरुणाचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले असून, नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चास शिवारात भोयरे पठार गावाकडे जाणार्‍या कच्च्या रस्त्यावर सोमवारी(दि. 17) सकाळी तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला होता. माहिती मिळताच अहिल्यानगर ग्रामीणचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केला. मंगळवारी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या प्राथमिक अहवालानुसार त्याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार नगर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र, त्या तरुणाची ओळख अद्यापि पटलेली नाही. ओळख पटविण्यासाठी नगर तालुका पोलिस प्रयत्न करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT