डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना  File Photo
अहिल्यानगर

विखे कारखान्याची निवडणूकही जाहीर; 9 मे रोजी मतदान

उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून होणार सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

शिर्डी : प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमही पुणेस्थित राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. त्यानुसार 9 मे 2025 रोजी मतदान होणार असून 10 मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे.

राहाता प्रशासकीय इमारतीत (राहाता तहसील कार्यालय) निवडणूक निर्णय अधिकारी, शिर्डी यांच्या कार्यालयात 3 एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधीत साप्ताहिक व शासकीय सुटीचे दिवस वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज विक्री स्वीकृती सुरू राहील, प्राप्त अर्जांची छाननी 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. छाननीनंतर वैध उमेदवारी अर्जांची यादी 15 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवार 15 एप्रिल ते 29 एप्रिल या कालावधीत अर्ज मागे घेऊ शकतात. माघारीनंतर प्रत्यक्ष निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 2 मे रोजी करण्यात येईल.

या निवडणुकीसाठी शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर तहसीलदार अमोल मोरे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची प्रारूप मतदारयादी 25 फेब्रुवारी व अंतिम मतदार यादी 19 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, असे निवडणूक अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT