Shirdi Saibaba mandir bomb threat:
शिर्डी: कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीसाईबाबांचे समाधी मंदिर पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी अज्ञात आरोपीने ईमेलद्वारे श्रीसाईबाबा संस्थानच्या मेल ॲड्रेसवर दिली आहे. या प्रकारानंतर मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. हा मेल तमिळनाडूतील साई मंदिराबाबत असल्याचे शिर्डी संस्थानने स्पष्ट केले आहे.
या प्रकाराने भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मंदिर सुरक्षा प्रमुख पोउनि रोहीदास माळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भा. न्या. सं . कलम ३५१ (४) प्रमाणे शिर्डी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . एसपी राकेश ओला यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक कलुबर्मे यांनी परिसरात भेट दिली असून पोनि गलांडे व पोसई जाधव हे पुढील तपास करीत आहेत
मेल तामिळनाडूतील देवस्थानाबाबत?
तामिळनाडू राज्यातील शिर्डी साई साई मंदिराला बॉम्बने उडून देण्याच्या धमकीचा मेल शिर्डीच्या संस्थानला आल्याची माहिती संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांनी 'पुढारी न्यूज' ला दिली. साई संस्थानला मेल आल्याने रोहिदास माळी यांनी पोलीसांत तक्रार दिली आहे. त्यामुळे शिर्डीत दक्षता घेतली आहे असेही प्रशासनाने स्पष्ट केले.