उसाचा ट्रॅक्टर उलटला pudhari
अहिल्यानगर

Accident news : उसाचा ट्रॅक्टर उलटला वीस फूट खोल खड्ड्यात

कर्जत-श्रीगोंदा रस्त्यावरील खड्डे चुकविताना अपघात; चालक बालबाल बचावला

पुढारी वृत्तसेवा

कर्जत : कर्जत-श्रीगोंदा रस्त्यावर वालवड शिवारामध्ये आज दुपारी एक वाजता ऊस घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टरला भीषण अपघात झाला. त्यात ट्रॅक्टर रस्त्यावरून वीस फूट खोल खड्ड्यामध्ये जाऊन पडला. चालकाने तत्परता दाखवल्यामुळे तो बचावला. अपघात एवढा भीषण होता की संपूर्ण ट्रॅक्टर तुटला. हा अपघात या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता खराब असल्यामुळे झाला आहे. या परिसरामध्ये मागील एक महिन्यामध्ये झालेला हा आठवा अपघात आहे.

याबाबत घडलेली घटना अशी की, कर्जत-श्रीगोंदा रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले आहेत. यामुळे हा ट्रॅक्टर खड्डे चुकवत जात असताना अचानक मोठ्या खड्ड्यामधून उलटला व रस्त्याच्या खाली वीस फूट खोल खड्ड्यामध्ये ट्रॉलीसह खाली जाऊन पडला. यामध्ये उसाचे व ट्रॅक्टरची देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.

श्रीगोंदा ते जामखेड या रस्त्यासाठी दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर करून सरकारने या रस्त्याची निविदा पाच वर्षापूर्वी प्रसिद्ध केली आहे. या रस्त्याचे काम सुरू होऊन अनेक वर्षे झाले तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. काम अपूर्ण असताना संबंधित कंपनीने या रस्त्यावर सुपे गावाच्या शिवारात टोलनाकाही सुरू केला होता. नागरिकांनी रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे हा टोल नाका बंद पाडला. मात्र अद्याप रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे संबंधित कंपनी आणि या कामाकडे दुर्लक्ष करणार्‍या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT