सोलर प्रकल्पावर तोडफोड, कर्मचार्‍यांना बेदम मारहाण; पाच आरोपींना पोलिस कोठडी Pudhari
अहिल्यानगर

Solar project Vandalism: सोलर प्रकल्पावर तोडफोड, कर्मचार्‍यांना बेदम मारहाण; पाच आरोपींना पोलिस कोठडी

मांडवा येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Vandalism at solar project site

पाथर्डी: मांडवा (ता. पाथर्डी) येथे सुरू असलेल्या बोंडडा इंजिनियरिंग लि., हैदराबाद या कंपनीच्या सोलार प्रोजेक्टवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मारहाण करून जबरीने मोबाईलसह इतर मुद्देमाल चोरून नेण्याची, तसेच ट्रॅक्टर आणि काँक्रीट मिक्श्चरची तोडफोड करण्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पाच जणांना पाथर्डी पोलिसांनी तत्काळ अटक केली असून, न्यायालयाने त्यांना 12 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

गेल्या 8 व 9 ऑगस्ट रोजी आरोपी महेश मच्छिंद्र लंवाडे, शंकर भाऊसाहेब बर्डे, अप्पासाहेब श्रीपती गावडे, महेश संभाजी बर्डे, सागर अरुण बर्डे यांच्यासह काही अनोळखी व्यक्तीीं सोलार प्लांटवर येऊन फिर्यादी व कामगारांना ‘काम बंद करून येथेून निघून जा’ अशी दमदाटी केली. त्यानंतर वॉचमन मिलिंद पाटील व मयूर बाबासाहेब डोईफोडे यांना शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचे मोबाईल व तीन प्लॅस्टिक खूर्च्या लांबविल्या.  (Latest Ahilyanagar News)

याचवेळी त्यांनी ट्रॅक्टर व काँक्रीट मिक्सरची तोडफोड करून मोठे नुकसान केले. या तक्रारीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आरोपींना अटक केली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पुजारी, पोलिस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, संदीप ढाकणे, पोलिस हवालदार नितीन दराडे, अभयसिंग लबडे, पोलिस नाईक सुखदेव धोत्रे, अक्षय वडते, संजय जाधव, शाम बनकर, सागर बुधवंत यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT