Eye donation of siblings after death:
एकरूखेः निळवंडे धरणाच्या बंधार्यात बुडून सख्या भाऊ - बहिणीचा करुण अंत झाला. ही दुर्घटना राहाता तालुक्यातील कोर्हाळेगावातील भांबारेमळा येथे घडली. साहिल प्रशांत डोषी (12) व दिव्या प्रशांत डोषी (15) या दुर्दैवी मृत भावंडांची नावे आहेत. दरम्यान, साहिल व दिव्याचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. यानंतर कोर्हाळेगावात त्यांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित मित्र मंडळीसह नातेवाईकांना अश्रू अनावर झाल्याचे हृदयस्पर्शी चित्र दिसले. (Ahilyanagar News Update)
अनेक वर्षानंतर प्रथमच कोर्हाळे गावात निळवंडेचे पाणी मंगळवारी दाखल झाले, परंतू या पाण्याचा साठा बुधवारी अचानक वाढला. वाहत्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी भावंडे गेले असता, त्यांचा पाण्यात बुडून करुण अंत झाला.
दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्रवरा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील वाकडी येथे कार्यक्रमासाठी आले असता, या दुर्घटनेची माहिती समजताच, त्यांनी अधिकार्यांशी संपर्क साधून, दुर्घटनास्थळी दाखल होण्याचे निर्देश दिले.
राहात्याचे पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण तत्काळ दुर्घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्यातून बाहेर काढून, ते शविच्छेदनासाठी राहाता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.