शिर्डी : श्री साईबाबा संस्थानच्या वतीने विक्री करण्यात येणार्या प्रसाद लाडूच्या दरात 50 टक्के वाढ करण्यात आली आहे. पूर्वी 20 रुपयांना मिळणारे दोन लाडूचे पाकीट आता 30 रुपयांना मिळणार आहे. या दरवाढीमुळे साईभक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे. साई दर्शनानंतर भाविकांना मोफत वाटल्या जाणार्या बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्याच्या हेतूने साई संस्थानने ही दरवाढ केल्याचे बोलले जात आहे. यानिमित्त जाणून घेऊया, लाडू प्रसादाची आतापर्यंतची आकडेवारी आणि बनवण्याची प्रक्रिया...
बुंदी बनवणे : शुद्ध तुपामध्ये मोठ्या कढईत मशिनद्वारे बेसन पिठाची बारीक बुंदी तळली जाते.
साखरेचा पाक : दुसर्या बाजूला मोठ्या बॉयलरमध्ये साखरेचा पाक तयार केला जातो.
मिश्रण तयार करणे : तळलेली गरमागरम बुंदी तयार झालेल्या साखरेच्या पाकात ओतली जाते व मोठ्या मिक्सरमध्ये एकजीव केली जाते.
सुकामेवा घालणे : या मिश्रणात काजू आणि मनुके यांसारखा सुकामेवा टाकला जातो.
लाडू वळणे : तयार झालेले मिश्रण एका कन्व्हेयर बेल्टवरून पुढे सरकवले जाते, जिथे कर्मचारी हाताने किंवा मशिनच्या साहाय्याने त्याचे एकसारख्या आकाराचे लाडू वळतात.
पॅकेजिंग : तयार झालेले लाडू थंड झाल्यावर त्यांचे 3-3 च्या पॅकेटमध्ये पॅकिंग केले जाते आणि विक्रीसाठी पाठवले जातात.
दैनंदिन उत्पादन : रोज 70,000 ते 90,000 लाडू तयार केले जातात.
सण, उत्सव आणि सुट्ट्यांमध्ये : ही संख्या दररोज 1 लाखाहून अधिक होते.
वार्षिक उत्पादन : वर्षाला सुमारे
3 कोटींहून अधिक लाडूंचे उत्पादन.
लागणारे दैनंदिन साहित्य (अंदाजे)
बेसन (हरभरा डाळीचे पीठ) :
3,000 ते 4,000 किलो
साखर : 5,000 ते 6,000 किलो
शुद्ध तूप : 800 ते 900 किलो
सुकामेवा (काजू, मनुके) :
200 ते 250 किलो
मनुष्यबळ : लाडू बनवण्याच्या या प्रक्रियेत सुमारे 220 कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतात.