अहिल्यानगर: शुक्रवारी जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या आमसभेत शासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी नागरिकांनी जामखेड नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या गटार योजनेत ठेकेदारांकडून होत असलेले निकृष्ट दर्जाचे काम उघड केले.
तक्रारींवर अधिकाऱ्यांकडून मोघम उत्तरे मिळताच आमदार रोहित पवारांचा आक्रमकपणा पहायला मिळाला. आतापर्यंत गोट्या खेळत होता का? तक्रार करणारे नागरिक बावळट, वेडी आहेत काय? तू मिजासखोर बनू नकोस. (Latest Ahilyanagar News)
हा तुमच्या बापाचा पैसा नाही, लोकांचा पैसा आहे. जास्त अहंकार आणि अटीट्यूड दाखवू नकोस,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्याला सुनावले. यापुढे अशा कामचुकार अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली नाही, तर जनतेला थेट शेण थापायला सांगा अशी फटकारणी देखील आमदार पवारांनी केली. या प्रसंगामुळे सभागृहात चांगलाच खडाजंगी माहोल पाहायला मिळाला....