रुग्णालयात खाटांचे आरक्षण  Pudhari
अहिल्यानगर

‘निर्धन, दुर्बल’चे आरक्षित बेड गायब ; जिल्ह्यातील ‘त्या’ रुग्णालयांना ‘धर्मादाय’चे अभय?

जिल्ह्यातील 26 रुग्णालयांना तशा सूचना

पुढारी वृत्तसेवा

निर्धन रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, तसेच दुर्बल घटकातील रुग्णांनाही अल्प दरात औषधोपचार व्हावेत, त्यांना रुग्णालयात खाटांचे आरक्षण मिळावे, यासाठी सार्वजनिक न्यास नोंदणी अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील 26 रुग्णालयांना तशा सूचना आहेत. संबंधित रुग्णालयांना डोनेशन घेण्याची परवानगी आहे, तसेच एकूण उत्पन्नातून दोन टक्के रकमेतून संबंधित रुग्णांवर उपचार करणे अपेक्षित आहे. मात्र काही रुग्णालय व्यवस्थापनाकडून ‘खाटा संपल्या’ असे उत्तर मिळत असल्याने धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून खरोखरच याबाबत तपासणी केली जाते का, असा सवाल आता पुढे येत आहे.

अहिल्यानगरच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे जिल्ह्यातील 26 रुग्णालयांची सार्वजनिक न्यास अंतर्गत नोंदणी पहायला मिळते. संबंधित रुग्णालयांना 12 ए, 80 जी व इतर प्रमाणपत्र असल्याने त्यांना डोेनेशन घेण्याची परवानगी आहे. डोनेशन देणार्‍या संस्थांना, व्यक्तींना शासनाच्या करामध्ये सवलत दिली जाते. तसेच संबधित रुग्णालयांचे एकूण वार्षिक उत्पन्नातून दोन टक्के रक्कम ही निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांवर उपचारासाठी खर्च करण्यात यावे, असे अभिप्रेत आहे.

निर्धन रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार

निर्धन रुग्णांसाठी रुग्णालयाच्या एकूण खाटांपैकी 10 टक्के इतक्या खाटांचे आरक्षण ठेवले जाते. 1 लाख 80 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या रुग्णाला निर्धन म्हणून खाटाचे आरक्षण आणि संपूर्ण मोफत उपचार देण्याची तरतूद असल्याचे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून सांगितले जाते.

दुर्बल घटकाला 50 टक्के सवलतीत उपचार

निर्धनप्रमाणेच दुर्बल घटकातील रुग्णांसाठीही 10 टक्के बेडचे आरक्षण आहे. हे आरक्षण एकत्रिपणेही गणले जात असल्याचे समजते.दुर्बल म्हणजे 3 लाख 60 हजारांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या रुग्णांचा समावेश होते. दुर्बल रुग्णांनाही बेड आरक्षित असते. मात्र मोफत ऐवजी 50 टक्के सवलतीत उपचार दिले जावेत, असे अभिप्रेत आहे.

बेडवर ‘आरक्षित, राखीव’ फलक बंधनकारक!

ज्या ठिकाणचे बेड आरक्षित ठेवलेले आहेत. त्या खाटावर निर्धन, दुर्बलसाठी ‘आरक्षित किंवा राखीव’ असे फलक लावणे रुग्णांलयांना बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात किती रुग्णालयात याची अंमलबजावणी केली जाते, याविषयीही साशंकता व्यक्त केली जात आहे.

रुग्णालयनिहाय आरक्षित खाटा व शुल्क

रुग्णालय मोफत निम्मे दर

आनंद ऋषी 10 10

जी.एस.गुणे 6 6

काकासाहेब म्हस्के 5 5

डॉ.विखे मेमोरियल 79 79

श्री साईनाथ शिर्डी 30 30

प्रवरा रुरल, लोणी 128 128

नित्यसेवा शेवगाव 15 15

विवेकानंद, राहुरी 14 14

सेंट लुक्स, श्रीरामपूर 10 10

साखर कामगार, श्रीरामपूर 15 15

वामनराव इथापे,संगमनेर 3 3

आरोळे हॉस्पिटल, जामखेड 3 3

श्रीशनैश्वर रुग्णालय, शिंगणापूर 6 6

आत्मामालिक, कोकमठाण 10 10

सिटी केअर, नगर 5 5

दर्शन रोटरी न.पा., संगमनेर 2 2

एकनाथ आयुर्वेद, शेवगाव 25 25

एस.एम.बी.टी, घुलेवाडी 100 100

अमृतवाहिनी, घुलेवाडी 10 10

आश्विनी रुरल, मांची हिल 20 20

सिद्धकला, संगमनेर 10 10

वृंदावन, गुंजाळवाडी 3 3

गरुड हॉस्पिटल, नगर 2 2

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT