Sarpanch aarakshan : जामखेड : तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत बुधवारी (दि 23) तहसीलदार गणेश माळी यांनी जाहीर केली होती. हे आरक्षण सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी होते. परंतु तालुक्यातील हाळ्गाव, धनेगाव व फक्राबाद ग्रामपंचायतच्या निवडणूक कार्यक्रम गोदर जाहीर झाला होता. त्यानुसार हळगाव, धनेगाव या दोन गावांचे अनुसूचित जातीसाठी आरक्षित तर फक्राबादचे सरपंचपद खुले होते. परंतु बुधवारी काढलेल्या आरक्षणामध्ये हळगाव, धनेगाव व फक्राबादचे आरक्षण बदलले. त्यामुळे गोंधळ उडाला. गुरुवारी (दि 24) महिलांचे आरक्षण काढणार होते. तेदेखील रद्द झाले आहे.
हळगाव, फक्राबाद, धनेगाव या तीन ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे सन 2020 ते 25 या वर्षाकरिताचे आरक्षण काढण्यात आलेले होते. मात्र काही कारणास्तव सदर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पुढे पुढे ढकलत गेली व विहीत कालावधीत निवडणूक पार पडलेली नसल्याने त्या सरपंचपदाची आरक्षण सोडत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींची मिळून करणे अपेक्षित आहे. परंतु तीन ग्रामपंचायतींची निवडणूक न झाल्यामुळे त्या ग्रामपंचायती सोडत कार्यक्रमात सहभागी करून घ्यावी किंवा कसेही याबाबत राज्य शासन व राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शनासाठी विविध जिल्ह्यांनी प्रस्ताव सादर केलेले होते. सदर मार्गदर्शन प्राप्त न झाल्यामुळे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती सोडत काढण्यासाठी नियमानुसार घेण्यात आलेल्या होत्या.
जामखेड तालुक्यातील हळगाव, फक्राबाद व धनेगाव या तीन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत 2020-25 मध्ये काढण्यात आली होती. असे असताना या ग्रामपंचायतींचे आरक्षण बुधवारी(23) पुन्हा काढण्यात आले होते. त्यामुळे आरक्षण प्रक्रियाच रदृ करुन नव्याने 55 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत उद्या शुक्रवारी (दि.25) काढण्यात येणार आहे. दुपारी 2 वाजता अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण तहसीलस्तरावर तर सायंकाळी 4 वाजता प्रांतस्तरावर महिला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.