साईभक्तांची लूट टाळण्यासाठी दुकानदारांसाठी नियमावली?  File Photo
अहिल्यानगर

साईभक्तांची लूट टाळण्यासाठी दुकानदारांसाठी नियमावली?

डॉ. सुजय विखे: शिर्डी विकासाच्या दृष्टीने प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

शिर्डी: दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डीत केलेल्या वेगवेगळ्या उपाय योजनांचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. आता अतिक्रमणे काढून साईभक्तांची लूट होणार नाही, बेघरांना जागा तसेच शहर विकासासाठी पाऊल उचलले जात आहे. साईभक्तांची लूट टाळण्यासाठी दुकानदारांसाठीही नियमावली केली जाईल, अशी माहिती माजी खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

विखे पाटील यांनी शिर्डी येथे माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, निर्माण झालेला बेशिस्तपणावर कारवाई केली जात आहे. त्यावर राजकारण करणे योग्य नाही. अवैध धंदे, दारू अड्डे, मटका, पॉलिसी, अवैध वाहतूक यावर पोलीस कारवाई करत आहे. साईभक्तांची लूट टाळण्यासाठी पुढील टप्प्यात दुकानासाठी निर्बंध करु.

11 नंबर चारीवरील मंडळी न्यायालयात गेली होती. स्टे उठल्यावर त्यांनी पाठपुरावा केला नाही. प्रशासकीय यंत्रनेने नियमाचे पालन करत अतिक्रमण काढले आहे. निमगावातील गट नंबर 401 मध्ये जागा देणार होतो, पण निमगाव निघोज ग्रामसभेचा त्याला विरोध होता. आता गट नंबर 276मध्ये जागा देण्याचा विचार सुरू आहे.

दुहेरी हत्याकांडानंतर सुरू झालेल्या मोहिमेचे चांगले परिणान दिसू लागले आहेत. प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहे. भविष्यात आतिक्रमणासह साईभक्त हितासाठी प्राधान्याने काम केले जाईल, अशी भूमिका डॉ सुजय विखे यांनी मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT