राहुरी: दारुच्या नशेत असलेल्या एका मित्राने त्याच्या 32 वर्षीय विवाहित मैत्रीणीशी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याची घटना राहुरी तालुक्यातील एका गावात घडली. एक 32 वर्षीय विवाहित तरुणी संगमनेर तालुक्यातील एका गावात राहते.
तीचे अक्षय याच्या सोबत मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे दोघांचे फोटो व व्हिडिओ अक्षय याच्या मोबाईलमध्ये काढलेले आहेत. दि. 16 जून रोजी ती तरुणी राहुरी तालुक्यात नातेवाईकांकडे आली होती. दि. 17 जून रोजी तीचा मित्र अक्षय हा दारु पिवुन तेथे आला. (Latest Ahilyanagar News)
त्याने तरुणीचा हात धरुन तीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तु जर माझ्या बरोबर आली नाही तर मी तुला, तुझ्या नवर्याला व मुलांना जिवच मारुन टाकीन, अशी धमकी देवुन शिवीगाळ केली. तसेच माझ्याकडे आपल्या दोघांचे फोटो आहेत. ते फोटो मी व्हायरल करेल, अशी धमकी दिली.
घटने नंतर तरुणीने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय कैलास आहेर, रा. झरेकाठी, ता. संगमनेर, याच्या विरोधात विनयभंग व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हनुमंत आव्हाड हे करीत आहे.