Rahuri Bypoll Election Training Pudhari
अहिल्यानगर

Rahuri Bypoll Election Training: राहुरी पोटनिवडणूक 2026: 1834 कर्मचाऱ्यांचे ईव्हीएम प्रशिक्षण पूर्ण

महात्मा फुले कृषी विद्यापीठात द्वितीय टप्प्यातील प्रशिक्षण; मतदान प्रक्रियेचे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक मार्गदर्शन

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठातील नानासाहेब पवार सभागृह तसेच सावित्रीबाई फुले हायस्कूल येथे यशस्वीरित्या पार पडले. या प्रशिक्षणासाठी एकूण 1834 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रशिक्षणादरम्यान उपस्थित कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेची सविस्तर सैद्धांतिक माहिती देण्यात आली. यासोबतच ईव्हीएम मशीन हाताळणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून मतदान प्रक्रियेबाबतची अचूक माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणास निवडणूक निरीक्षक देवानंदा रेयांग, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया, निवडणूक निर्णय अधिकारी अनुप सिंह यादव, जिल्हा नोडल अधिकारी गौरी सावंत तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अमित पवार यांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणाची मुख्य जबाबदारी राहुरीच्या निवासी नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी पार पाडली. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवडणूक नायब तहसीलदार बडे, महसूल नायब तहसीलदार बाचकर, पुरवठा निरीक्षक सुदर्शन केदार सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, झोनल अधिकारी व मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT