श्रीरामपुर: बारावीनंतर काय असा प्रश्न आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पडत असतो. कारण 12 वी नंतर विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा असतो. यानंतर काय केले पाहिजे त्यासाठी कायकाय केले पाहिजे याबाबत योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्याचे करिअर घडू शकते. ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे त्यात आपण त्यात करिअर केले पाहिजे, त्यासाठी करिअर करताना नक्कीच फिट आणि तंदुरुस्त राहिले पाहिजे. करिअर करतांना जे नवनवीन बदल होत असतात ते स्वीकारले पाहिजे. एआय आणि रोबोटिक्समुळे विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. एआयमुळे नोकऱ्या मिळणार नाहीत असा गैरसमज झाला आहे. मात्र एआय आणि रोबोटिक्समुळे अनेक संध्या प्राप्त होणार आहेत, असे आवाहन पुढारी माध्यम समूहातर्फे श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पुढारी कॅम्पस टू करिअर उपक्रमात शिक्षण तज्ञांनी मार्गदर्शन केले.
श्रीरामपूर येथील खा. गोविंदराव आदिक सभागृहात काल पुढारी समूहाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पुढारी कॅम्पस टू करिअर मार्गदर्शन शिबिरात विविध शैक्षणिक विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पुढारी कॅम्पस टू करिअर मार्गदर्शन शिबिरास सुरुवात करण्यात आली. उपस्थित तज्ञ मान्यवरांचे स्वागत पुढारी माध्यम समूहातर्फे करण्यात आले. यावेळी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर महेश जगताप, विश्वकर्मा युनिव्हर्सिटीचे राहुल माटे, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे प्रा. मुकेश अग्रवाल, शैक्षणिक मार्गदर्शक सार्थक पाटील, डिजिटल रोबेटिक्सचे प्रा. राज जाधव आदी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रसन्न धुमाळ यांनी केले. प्रास्ताविक पुढारी उद्योग समूहाचे सरव्यवस्थापक डॉ. सुनील लोंढे तर आभार पुढारी श्रीरामपूर विभागीय कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक विष्णू वाघ यांनी आभार मानले.
डिजिटल रोबेटिक्सचे प्रा. राज जाधव
12 वी नंतर विद्यार्थ्यांच्या करिअरची सुरुवात होते. यावेळी आपल्यात कौशल्य असेल तर आपल्याला करिअर निवडण्यासाठी काळजी करण्याचे कारण नाही. ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे त्यात आपण त्यात करिअर केले पाहिजे त्यासाठी करिअर करताना नक्कीच फिट आणि तंदुरुस्त राहिले पाहिजे. करिअर करतांना जे नवनवीन बदल होत असतात ते स्वीकारले पाहिजे. एआय आणि रोबोटिक्समुळे विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. एआयमुळे नोकऱ्या मिळणार नाहीत असा गैरसमज झाला आहे. मात्र एआय आणि रोबोटिक्समुळे अनेक संध्या प्राप्त होणार आहेत. एआय आणि रोबोटिक्समध्ये विद्यार्थ्यांना करिअर करणे उपयुक्त ठरणार आहे. एआय आणि रोबोटिक्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवला तर एआय विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. यासाठी आमच्याकडे संपर्क साधावा आम्ही नेहमीच सहकार्य करू, असेही त्यांनी सांगितले.
शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक सार्थक दातीर, पुणे
12वी नंतर आपल्याला काय करायचे यांबाबत आपण ठाम राहिले पाहिजे. यात आपल्याला काय आवडते आणि आपण कोणत्या क्षेत्रात आपलं करिअर चागलं करू शकतो तिकड लक्ष द्या. आपण ज्या क्षेत्रात ऍडमिशन घ्यायचे आहे तेथील ऍडमिशनची पद्धत जाणून घेणे गरजेचे आहे. जे विद्यार्थी शिक्षणासाठी ऍडमिशन घ्यायचं आहे परंतु घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी डॉक्युमेंट वेरिफिकेशन तुम्ही दोन पद्धतीने करू शकता एक तर ऑनलाईन पद्धतीने दुसरी गोष्ट ऑफलाइन पद्धतीने करु शकतात. डॉक्युमेंट वेरिफिकेशन कसे करायचे याचे देखील डिटेल्स तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट पहायला मिळेल. आता समाज कल्याण ऑफिस पुणे यांनी नुकताच एक जीआर काढलेला आहे तर यामध्ये अजून स्टेट ने काय तो पास केलेला नाही. तुम्हाला जे कॉलेज घ्यायचे आहे त्या ठिकाणी जाऊन चौकशी करून तेथील शिकविणारे शिक्षक वर्ग कसा आहे हे पाहूनच तुम्ही तुमचं ऍडमिशन घ्या. नुसत कोणी सांगितले की हे कॉलेज खूप चांगले आहे म्हणून ते कॉलेज निवडू नका. तेथे असलेली फी आपल्याला योग्य राहील का नाही याची खात्री करा. ऑनलाईन अथवा ऑफ कोण अर्ज भरताना चुकलो तर ऍडमिशन घेण्यास मुकावे लागेल. यासाठी चुका होऊ नये म्हणून आपल्याला व्यवस्थित माहिती मिळाली पाहिजे. तुमच्याकडे स्किल्स असतील तर तुम्ही रिप्रेझेंट कंपनी समोर चांगल्या पद्धतीने उभे राहू शकतात.
विश्वकर्मा युनिव्हर्सिटीचे राहुल माटे, पुणे
पी. व्ही नरसिंहराव जेव्हा भारताचे पंतप्रधान होते तेव्हा भारतामध्ये खाजगी विद्यापीठांचे अस्तित्व निर्माण झाले. तेव्हा भारताची लोकसंख्या ही 90 कोटी होती त्या 90 कोटी जनतेला शिक्षण मिळावं ह्या उद्देशाने खाजगी विद्यापीठात स्थापन करण्यात आली. तुम्ही एनजीओ ऑर्गनायझेशन आहे तेथे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देतात. या स्कॉलरशिप भारतातल्या सर्व खाजगी विद्यापीठांना मिळतात का त्यांना या स्कॉलरशिप मिळू शकते. कारण टाटा सारख्या मोठ्या कंपन्या आहेत या उद्योग समूहांना भारत सरकारने या कंपनीना सामाजिक कामासाठी प्रॉफिटच्या 5% रक्कम त्यांना यासाठी खर्च करायची सवलत दिली आहे त्याचा फायदा होऊ शकतो. अभ्यासाचा एक तर फोकस दडलेला असतो किंवा तुम्हाला योग्य मार्गदर्शन हे मिळत नसतं. भारताच्या शैक्षणिक धोरणची पॉलिसी जी आहे सर्व विद्यापीठांमध्ये राबवली जात आहे हे शिक्षण हे सर्वांसाठी आहे. आता एआय आलेला आहे. सायबर सिक्युरिटी मध्ये असेल, डेटा सायन्स मध्ये असेल किंवा तुमचा डिजिटल टेक्नॉलॉजी अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये येऊन क्रांती झाली नाही. आज तुम्ही स्वतःला एका क्षेत्राशी लिमिटेड होत आहेत तुम्हाला या विषयात आम्ही डिग्री घेतली आहे आहे त्याचाही फायदा करून घ्या आणि तुम्ही जे काही शिक्षण घ्या ज्या कुठल्या फ्रेंड मध्ये तुम्ही इंजिनिअरिंग करा तर त्याचा इतर क्षेत्रांशी कसा संबंध असेल याचाही विचार करा.
डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजचे विभाग प्रमुख डॉ. मुकेश अग्रवाल
एआय आल्यानंतर सगळ्यांची भीती वाढलेली आहे असं वाटतंय. की आता एआयमुळे मोठे नुकसान होणार. मात्र एआयमुळे एप्लीकेशनला युज करता येईल मॅथेमॅटिक्स पण लक्षात ठेवता येणार आहे त्यामुळे जॉबची संधी तर नक्कीच उपलब्ध होणार आहे. एखाद काम करायचा आहे. आता तो फॉर्म जो आहे त्याचा डिरेशन ठरवलं जाईल. हे काम करण्यासाठी किती वेळ लागेल तर एक वर्ष लागेल सहा महिने लागेल तीन महिने लागेल दोन वर्ष लागेल आणि त्याच्यासाठी लागणारी मॅनपावर आणि ही कॉस्टिंग आहे ती आधी ठरवली जाणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते काम दिलं जाईल की तुम्हाला आम्ही रिक्रुट करत आहोत दोन वर्षासाठी हे दोन वर्षाचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एवढा मानधन मिळणार आहे हे प्रोजेक्ट संपल्यानंतर तुमचा आणि आमचं काम संपलेला आहे त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टसाठी दरवेळेस नवीन नवीन गोष्टी कराव्या लागणार आहे. दर एक वर्षांमध्ये दोन वर्षांमध्ये तुम्हाला काही ना काही नवीन टेक्नॉलॉजी येत आहे ती तुम्हाला जे आहे आत्मसात करायची आहे इंजीनियरिंगच्या व्यतिरिक्त ज्या लोकांना असं वाटतं की इंजिनिअरमध्ये कसं करायचं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पाहिजे त्यासाठी डी वाय पाटील ग्रुपला रिप्रेसेंट करावे. तर डी वाय पाटील व्यतिरिक्तही पुण्यातल्या जेवढ्या टॉप कॉलेजेस मध्ये तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल त्याच्यासाठी आम्ही स्वतःहून मोफत मार्गदर्शन देत आहोत.
पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर महेश जगताप
पुढारी प्रस्तुत कॅम्पस टू कर्जत आग उपक्रम आहे अतिशय चांगला उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. शिक्षण ज्या ठिकाणी चांगले असतील त्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्यावे. आपणही जे काही शिक्षण घेणार आहे त्याचा उपयोग आपल्या गावातही, समाजासाठी झाला पाहिजे. कंपनी प्लेसमेंट करताना या गोष्टीचा विचार करते हे लक्षात ठेवा तुम्हाला किती मार्क्स आहे यापेक्षा तुम्ही प्रॉब्लेम किती क्रिटिकल सोडवतात, परंतु त्यानंतर तुम्ही चार वर्षांमध्ये कसा अभ्यास करतात हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही डिग्री करता करता कुठली सर्टिफिकेशन प्रोसेस केली ऑफ एज्युकेशन फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला तुमचा मोबाईलवर सुद्धा अभ्यासायला मिळतील त्याच्यामध्ये काही कोर्सेस हे चार आठवडे यांचे आठ आठवड्यांचे 12 कमीत कमी 16 प्रोसेस असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवणारे टीचर आयआयटी, एनपीटीचे शिक्षण घेतले शिक्षक असतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी इंजिनियाय होतात. तुम्हाज अनुभव कसा मिळतो तुम्हाला कोणते क्षेत्र निवडतात. त्यातही तुमच्या आवडीचे विषय निवडा नाही तर वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे.