Ahilyanagar News: एका अज्ञात व्यक्तीने कोवातली पोलीस ठाण्यात फोन करून ठाणे अंमलदार महिलेला अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. तसेच, पोलीस कर्मचारी व पोलीस अधिकार्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करून राजकीय पुढारी व प्रशासकीय अधिकार्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊसाहेब शिंदे (रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) असे त्याचे नाव आहे. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की शुक्रवारी (दि. 6) सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात भाऊसाहेब शिंदे याचा फोन आला. त्याने ठाणे अंमलदार महिला कर्मचार्याला शिवीगाळ केली. त्यानंतर पोलीस कर्मचार्यांनी त्याचा फोन नंबर मिळविला.
त्याला फोन केला असता त्याने त्या कर्मचार्यालाही शिवीगाळ केली. त्यानंतर पोलीस अधिकार्यांनी फोन केला असता त्याने पोलीस अधिकार्यांना शिवीगाळ करून राजकीय पुढारी व प्रशासकीय अधिकारी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. पोलिसांनी रात्री उशिरा भाऊसाहेब शिंदे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याची मनस्थिती ठिक नसल्याचे समोर आले. त्यानंतर नोटीस देवून त्याला सोडून देण्यात आले.