Nagar Bike Theft Racket Arrest Pudhari
अहिल्यानगर

Nagar Bike Theft Racket Arrest: भिंगार ते जामखेड थेट चोरीच्या मोटारसायकलींची विक्री! पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश, तब्बल २४ मोटारसायकली जप्त.

'आज्या' आणि 'असिफ'ला बेड्या! अहिल्यानगर (नगर) आणि नेवासा येथून चोरलेल्या दुचाकींची विक्री करत होते; आरटीओकडून गाड्यांची पडताळणी सुरू.

पुढारी वृत्तसेवा

नगर : अहिल्यानगर व नेवासा येथून चोरी केलेल्या मोटारसायकलींची भािंगरमधून विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून 24 मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या.

असिफ इकबाल सय्यद (रा. रंगारगल्ली,हल्ली रा.आलमगीर भिंगार) आणि आझाद ऊर्फ आज्या हारुन शेख (रा. प्रबुध्दनगर, आलमगीर) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.

शहरातून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी विशेष पथकाला तपासाचे निर्देश दिले. गुन्हे शोध शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश देशमुख यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे असिफ इकबाल

सय्यदचा मागमूस शोधला. त्याला भिंगारमधून ताव्यात घेत चौकशी केली. मोटारसायकली चोरीची कबुली देत त्याने चोरीच्या मोटारसायकली आझाद ऊर्फ आज्या हारुन शेख याच्याकडे विक्रीसाठी ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी आज्याचा शोध घेतला असता तो जामखेडला असल्याचे समजले. पोलिस पथकाने जामखेडमधून आज्याला ताब्यात घेत चौकशी करता त्याने मोटारसायकली चोरीची कबुली दिली.

आरटीओकडून पडताळणी

दोघांची चोरी केलेल्या 24 मोटारसायकली हस्तगत केल्या. कोतवाली पोलिसांत दाखल मोटारसायकल चोरीच्या फिर्यादीची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी कोतवाली पोलिसांनी विभागीय प्रादेशीक परिवहन विभागाकडे पत्र व्यवहार केल्याचे पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT