पाथर्डी : मोहटा देवी गडावर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी देवीची महापूजा करून दर्शन घेतले. या प्रसंगी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. महापूजेच्या वेळी आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भंडारी, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, विश्वस्त डॉ.श्रीधर देशमुख, शशिकांत दहिफळे आदी उपस्थित होते.(Latest Ahilyanagar News)
मंदिर परिसरात भाविकांनी जयजयकार करत मंत्रोच्चाराच्या गजरात पूजेचा धार्मिक सोहळा पार पडला. मोहटा देवी गड हा पाथर्डी तालुक्यातील तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील अत्यंत श्रद्धेचा केंद्रबिंदू असून वर्षभर भाविक येथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी देवीचे दर्शन आवर्जून घेतले.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यासह राज्यात सुख-समृद्धी येऊन अतिवृष्टीमुळे पिडित शेतकरी, सर्वसामान्य जनता यातून सुखरूप बाहेर येतील व या जनतेच्या कल्याणासाठी देवीच्या चरणी विशेष प्रार्थना केली.मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री व मान्यवरांचे स्वागत यावेळी मोहटादेवी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे,जनसंपर्क अधिकारी भिमराव खाडे आदी उपस्थित होते.
पाथर्डी : पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मोहटा देवीची पूजा करून आरती केली.