संगमनेर: संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. नगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर संगमनेर शहराचा विकासाचा वेग दुप्पट होईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे.
संगमनेर नगरपालिकेच्यावतीने पंचायत समिती जवळील गुंजाळनगर परिसरात उभारण्यात येत असलेल्या ट्रक टर्मिनलच्या कामाची पाहणी प्रसंगी ते बोलत होते. आ. खताळ म्हणाले, नगरपालिकेत महायुतीचा नगराध्यक्ष व नगरसेवक बसेल तेव्हाच शहराच्या विकासाचा वेग दुप्पट होईल. (Latest Ahilyanagar News)
संगमनेर शहराच्या विविध प्रभागामध्ये काही समस्या आहे. त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी येणार आहे. या निधीतून शहरात गेल्या चाळीस वर्षापासून खुंटलेला विकास पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू. संगमनेरच्या जनतेने नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या सोबत रहावे.
शहरातील नवीन नगर रोडचे काम पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार असल्याचे आ.खताळ यांनी सांगितले. शिवम गुंजाळ, लालू गुंजाळ, सचिन शहाणे, हेमंत गाडेकर, निखिल धुमसे, विलास घुले, अवधूत साबळे, निखिल गाडेकर, सौरव गुंजाळ, आदित्य नवले, यश गुंजाळ, अनिल गुंजाळ, प्रदीप राजपूत, प्रवीण गुंजाळ उपस्थित होते.