जुन्या वादातून गोळीबार File Photo
अहिल्यानगर

जुन्या वादातून अल्पवयीन मुलाचा गोळीबार ; एक जण जखमी

एक जखमी, आरोपीस अटक

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर : महाविद्यालयातील जुन्या वादातून अल्पवयीन मुलाने सूतगिरणी-दिघी रस्त्यावरील रेल्वे गेटजवळच गावठी कट्ट्यातून दोघांवर दोन गोळ्या झाडल्या. त्यात एक जखमी झाला असून चुकविलेली गोळी दुचाकीच्या खोपडीत घुसली. श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अल्पवयीन मुलास अटक केली आहे.

फिर्यादीची आत्याचे श्रीरामपूरच्या भैरवनाथनगर येथे नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामाला पाणी मारण्यासाठी फिर्यादी व त्याचा भाऊ व अन्य एक (सर्व अल्पवयीन) हे दिघी गावाकडे निघाले होते. आत्याच्या दुचाकीवर (एमएच 12 टीटी 8751) फिर्यादी आणि त्याचा भाऊ बसले होते. त्यांच्या ओळखीचा अल्पवयीन मुलगा समोरून दुचाकीवर आला. ‘तूच त्याचा भाऊ का?’ असे तो म्हणाला. ‘मीच त्याचा भाऊ, काही काम आहे का?’ असे उत्तर त्यांनी दिले. अल्पवयीन मुलाने महाविद्यालयात झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करत कमरेला लपवलेला गावठी पिस्तूल बाहेर काढले आणि पायावर गोळी मारली. पिस्तुलातील गोळी जमिनीवर आदळून फिर्यादीच्या भावाच्या पायाला लागल्याने तो जखमी झाला. हे पाहून फिर्यादी घाबरून गाडीवरून उतरून पळाला, तेव्हा फिर्यादीच्या दिशेने त्याने दुसरी गोळी झाडली. परंतु ती फिर्यादीने चुकविलेली गोळी दुचाकीच्या हेडलॅम्पला लागली. गोळीबारामुळे आसपासच्या लोकांनी आरडाओरडा केला. ते पाहून गोळीबार करणारा अल्पवयीन मुलगा दुचाकीवरून सूतगिरणीच्या दिशेने पसार झाला.

जखमी मुलास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी गोळीबार करणार्‍या अल्पवयीन मुलास अटक केली आहे. यातील फिर्यादी व त्याचा तसेच आरोपी सर्व जण अल्पवयीन आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT