नायलॉन मांजा Pudhari
अहिल्यानगर

Crime News : दहा हजारांचा मांजा जप्त

आईस्क्रीम पार्लरमध्ये पाच हजारांचा नायलॉन मांजा

पुढारी वृत्तसेवा

भिंगार कॅम्प पोलिसांनी मुकुंदनगर येथील आयाशामधील जवळ रजा सुपर मार्केट व नागरदेवळे येथील द्वारकाधीश कॉलनीजवळील महाराष्ट्र पत्रा सेंटर छापा घालून सुमारे दहा हजारांचा नायलॉन मांजा जप्त केला. ही कारवाई सोमवारी (दि. 13) सायंकाळी करण्यात आली. दोघांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुकुंदनगरमध्ये आयशा मस्जिदजवळील रझा सुपर मार्केट व आईस्क्रीम पार्लरमध्ये लपवून नायलॉन मांजा विक्री होत असल्याचे माहिती भिंगार कॅम्प पोलिसांनी मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी मुकुंदनगर येथील रझा सुपर मार्केट व आईस्क्रीम पार्लरमध्ये छापा घालून पाच हजारांचा नायलॉन मांजा जप्त केला.

तर, इरफान लाल राजेश शेख (रा. नावेद कॉम्प्लेक्सजवळ मुकुंदनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस हेडकॉन्स्टेबल रवींद्र टकले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दुसर्‍या कारवाईत भिंगार कॅम्प पोलिस पथकाने नागरदेवळे हद्दीतील द्वारकाधीश कॉलनीमध्ये महाराष्ट्र पत्रा सेंटर येथे सुमारे पाच हजार रुपये किंमतीचा नायलॉन मांजा पकडला. पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रमोद लहारे यांच्या फिर्यादीवरून आशरफ बाहुल्ला खान (वय 48, रा. आलमगीर, नागरदेवळे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT