गणेश जेवरे
कर्जत: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने कर्जत(जि. अहिल्यानगर) येथे 26 ते 30 मार्च दरम्यान होणार्या 66 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेला बुधवारी दिमाखात प्रारंभ झाला. 57, 65 व 74 किलो वजन गटात गादी व माती विभागात पहिली फेरी पार पडली. पहिल्या फेरीत कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, पुणे जिल्हा व अहिल्यानगरच्या मैलांनी मैदान गाजविले.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आमदार रोहित पवार मित्र परिवार व अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ यांच्या वतीने आयोजन केले आहे. उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, उपाध्यक्ष संभाजी वरूटे, वरिष्ठ उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, खजिनदार सुरेश पाटील, गणेश कोहळे, परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आदी उपस्थित होते. राज्यभरातून 800 हून अधिक मल्ल सहभागी झाले आहेत. यात 45 कुस्ती संघ असून सध्या 43 संघ या स्पर्धेसाठी आले आहेत.
पहिल्या फेरीचा निकाल
57 किलो गादी विभाग : आकाश पगारे (नाशिक), प्रेम भोईर (कल्याण), मोहम्मद शेख (अमरावती), चेतन यमगर (जवळगाव), सचिन मुरकुटे (अहिल्यानगर), सुशांत चौधरी (ठाणे ग्रामीण), भुजंग सोरते (परभणी), सचिन चौगुले (मुंबई शहर), विजय धुळे (रायगड).
65 किलो गादी विभाग : पवनराज काळे (धाराशिव), हर्षवर्धन बजवळकर (मुंबई उपनगर), ओमकार गायकर (रायगड), प्रितेश भगत (कल्याण), करण बागडे (छत्रपती संभाजीनगर), संतोष लाहोळ (अकोला), आकाश नागरे (बीड), ऋषिकेश उचाळे (अहिल्यानगर)
74 किलो गादी विभाग : आकाश दुबे (पुणे शहर), भूषण पाटील (नाशिक शहर), नाथा पालवे (मुंबई उपनगर), मारुती शिंदे (धाराशिव), आजिनाथ लोखंडे (जळगाव), पांडुरंग फरकाडे (छत्रपती संभाजी नगर), सार्थक दणवले (गडचिरोली)
57 किलो माती विभाग : रोहित कुंभार (पिंपरी चिंचवड), स्वप्नील पवार(सांगली), सोहन लोखंडे (कल्याण), यज्ञेश मसने (ठाणे ग्रामीण), ओंकार निगडे (पुणे शहर), अजित मानकर (कोल्हापूर), विशाल सुरवसे (सोलापूर)
65 किलो माती विभाग : सुरेश कोकाटे (पुणे जिल्हा), अनिकेत खेडकर(पुणे शहर), अनिकेत शिंदे (सोलापूर जिल्हा), जयेश वायले (कल्याण), तेजस पाटील (सांगली), पृथ्वीराज सरवदे (सोलापूर), योगेश गजबे नागपूर इमरान सयद जालना विजयी, परशुराम गुरव बुलढाणा श्रवण वाघमारे छत्रपती संभाजीनगर विजयी,
74 किलो माती विभाग : पार्श्व कोथळे (कोल्हापूर शहर), श्रीकांत दंडे (पुणे शहर), सोमनाथ चोपडे (छत्रपती संभाजी नगर), आदिनाथ शिंदे (गोंदिया), ऋतिक वाकडे(ठाणे ग्रामीण), संकेत हजारे (बुलढाणा ) सागर वाघमोडे(पुणे जिल्हा), संदीप मते (नाशिक शहर), सागर सुरवसे (धाराशिव)