अकोले: शेतकर्यांची कर्जमाफी, हमीभाव, पिक विमा, शेतीकामांना रोजगार हमीत समाविष्ट करा, मुक्त व्यापार करार रद्द करा, अशा विविध मागण्यांसाठी काल अखिल भारतीय किसान सभेने अकोले तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
याबाबत नायब तहसीलदार किसन लोहरे यांना निवेदन देण्यात आले. टेरीफच्या धोरणामुळे मोठे नुकसान होणार आहे. तसेच दूध, सोयाबीन, गहू, मका व इतर अनेक शेतकर्यांवर संक्रांत येणार आहे. अशा प्रकारचे घातक निर्णय सरकारने मागे घ्यावे, घराच्या तळजमिनीचा सर्वे पूर्ण केलेल्या निवास धारकांना पंचनाम्याचे पुरावे द्या, उर्वरित पंचनामे तातडीने पूर्ण करा, आदिवासी भागात अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे कावीळने पेशंट वाढत आहेत, त्यांना तातडीने शुद्ध पाणी पुरवठा द्या, पुढील वर्षी हिरडा झाड लागवडीच्या रोपांची आतापासूनच रोपे तयार करण्याची व्यवस्था करा. (Latest Ahilyanagar News)
पुरुष वाडी गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा द्या,65 वर्गावरील महिलांना लाडक्या बहिणीचे मानधन चालू करा,जाचक अटी शर्ती लावून लाडक्या वहिणींचे मानधन बंद करू नका,हिरड्याला हमीभाव द्या व हिरडा झाडाची सातबारा उतार्यावर नोंद करा, भंडारदरा धरणा अंतर्गत बुडीत बंधारे बांधा, प्रलंबित वनदावे मंजूर करा.
ग्रामीण भागात सततच्या पावसामुळे वार्याामुळे वीज पुरवठा सतत खंडित होत आहे लोकांना कायम अंधारात राहावे लागले नर्गमादा बोगस पद्धतीने विज बिले ग्राहकांना दिले गेले आहे अशी वाढीव बोगस वीजबिले रद्द करुन रितसर वीजबिले देण्यात यावी, राजूर आंदोलनात जीर्ण झालेले विद्युत पोल बदलण्याचे ठरले होते, त्याची अंमलबजावणी तातडीने करा, राजूर शहरातील बँकांमध्ये पुस्तके छापून मिळावी, महाराष्ट्र बँकेतील प्रिंटर तात्काळ चालू करावे, ग्रामीण भागातील बँकांमध्ये मनुष्यबळ वाढवावे, कोतुळ मुक्कामी नगर एसटी बस चालू करा, अकोले- वाघापूर ही बस बोरी-कोतुळ पर्यंत चालू करा, अशा विविध मागण्यांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.
निवेदनावर कॉ.सदाशिव साबळे,कॉ. नामदेव भागरे, कॉ.एकनाथ मेगाळ, कॉ.प्रकाश साबळे, कॉ.शिवराम लहामटे, कॉ. ताराचद विघे, कॉ.नामदेव पिपळे, कॉ.आराधना बोर्हाडे, कॉ.सगिता साळवे, कॉ.कुसा मधे, कॉ.जुबेदा मनियार आदीच्या सह्या आहेत.