छत्रपतींच्या पुतळ्यासमोर या, मी देतो पुरावे; किरण काळे यांचे महापालिका आयुक्तांना खुले आव्हान  Pudhari
अहिल्यानगर

Kiran Kale Arrested: अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच किरण काळेंना अटक

पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात करत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Kiran Kale Arrested After Atrocity Case Filed

नगर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगर शहरप्रमुख किरण गुलाबराव काळे यांच्या विरोधात 21 जुलै रोजी रात्री उशिरा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी किरण काळे यांना अटक केली आहे.

कर्जत येथील 21 वर्षीय विवाहित पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे, की तिच्या पतीला दारू पिण्याचे व्यसन असल्याने तो सातत्याने त्रास द्यायचा. 2019 च्या निवडणूक प्रचारासाठी किरण काळे कर्जतला आले असता त्यांना पाहिले होते.(Latest Ahilyanagar News)

त्यांनी भाषणात गोरगरिबांना मदत करत असल्याचे सांगितले. सोशल मीडियावरून काळे यांचा नंबर मिळविला. संपर्क करून पतीपासून होत असलेल्या त्रासापासून मदत मागितली. 2021 पासून फोनद्वारे आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. त्यानंतर काळे यांनी 2023 मध्ये नगरला बोलावून घेतले.

बसस्थानकावरून त्यांनी कारने चितळे रोडवरील संपर्क कार्यालयात नेले. मदत करण्याचे आमिष दाखवून त्यांनी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, तुला सर्व मदत करतो. असे सांगत काळे याने अत्याचार केल्याचे पीडित महिलेने म्हटले.

ही घटना कोणाला सांगू नको. नाहीतर माझ्या खूप ओळखी आहेत. तुला जिवंत सोडणार नाही असा दम देत मला बसस्थानकावर सोडले. त्यानंतर 2023 ते 2024 या कालवधीत पुन्हा तीनवेळा पीडितेला संपर्क कार्यालयात बोलावून काळे यांनी अत्याचार केला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT