Karjat Illegal Sand Mining Pudhari
अहिल्यानगर

Karjat Illegal Sand Mining Seizure: कर्जतमध्ये सीना नदीतील अवैध वाळू उपसा उघड; 6.04 लाखांचा ट्रॅक्टर जप्त

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई; चापडगाव येथील आरोपीवर गुन्हा दाखल, तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

कर्जत: तालुक्यातील सीना नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून तिची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपींवर कर्जत पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह 6 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सीना नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून तिची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती कर्जत पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चापडगाव ते कर्जत रस्त्यावरील भंडारी वस्तीजवळ छापा टाकला.

या कारवाईदरम्यान ट्रॅक्टर व त्यास जोडलेली ट्रॉली अडविण्यात आली. ट्रॉलीमध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाची चौकशी केली असता, तो संकेत सुनील शिंदे (रा. चापडगाव) असल्याचे निष्पन्न झाले.

पंचांसमक्ष पंचनामा करण्यात आला असून, त्यामध्ये एक ब्रास वाळू (किंमत 4 हजार रुपये) व ट्रॅक्टर (किंमत 6 लाख रुपये) असा एकूण 6 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात संकेत शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस कॉन्स्टेबल मच्छिंद्र जाधव, पोलिस हवालदार राजेंद्र थोरात, पोलिस कॉन्स्टेबल सानप व पोलिस कॉन्स्टेबल सचिन थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली. कर्जत अवैद्य वाळू उपसा करून चोरी करणारा ट्रॅक्टर व मालक या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT