Kalpana Kharat Lookout Notice Pudhari
अहिल्यानगर

Kalpana Kharat Lookout Notice: कल्पना खरातला लुकआऊट नोटीस

शिर्डीतील जमीन हडपल्याचा गुन्हा दाखल झाला असून त्यात अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पनाही आरोपी आहे.

पुढारी वृत्तसेवा

नगर: शिर्डी पोलिसात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी असलेली भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना परदेशात पळून जाण्याची शक्यता पाहता अहिल्यानगर पोलिसांनी तिला लुकआऊट नोटीस बजावली आहे. नगर पोलिसांच्या या कृतीमुळे तिचा परदेश पलायनाचा डाव फसणार असल्याचे मानले जाते.

शिर्डीतील जमीन हडपल्याचा गुन्हा दाखल झाला असून त्यात अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पनाही आरोपी आहे. शिर्डी, नाशिक पोलिस तिच्या मागावर असून ती पोलिसांना हुलकावणी देत पसार झाली आहे.

ती परदेशात पळून जाण्याची शक्यता वर्तवत पोलिसांनी तिची नाकाबंदी करण्याच्या दृष्टीने लुक आऊट नोटीस जारी केली आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश सर्वांत अगोदर शिर्डी पोलिसांनीच केला. नाशिकमध्ये गुन्हा दाखल होण्यापूर्वीच त्याच्याविरोधात अहिल्यानगर पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली होती. परदेशात पलायनाचा खरातचा डाव फसला अन्‌‍ तो पोलिसांच्या तावडीत सापडला.

24 तासांत मंजुरी

नगर पोलिसांनी बुधवारी कल्पना खरातला लुक आऊट नोटीस बजावण्याचा अहवाल तयार करून तो वरिष्ठांना पाठविला. वरिष्ठांनी मंजुरी देताच आज लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली. पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यास दुजोरा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT