FiIle Photo
अहिल्यानगर

जामखेड शहरामध्ये रात्री दरोडा घालणाऱ्या टोळीतील आरोपी जेरबंद

१७ लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

जामखेड : जामखेड शहरामध्ये रात्री दरोडा घालणाऱ्या टोळीतील 3 आरोपी जेरबंद करत संशयित आरोपींकडून १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेला यश आले आहे.

२६ फेब्रुवारी रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास फिर्यादी प्रतीक्षा शंकर रोकडे (रा. साकत फाटा, जामखेड) या त्यांच्या कुटूंबियांसह घरी असताना एका महिलेने " दिदी दरवाजा खोलो" असा आवाज दिला. फिर्यादीने घराचा दरवाजा उघडला त्यावेळी अज्ञात ७ ते ८ आरोपींनी चाकूचा धाक दाखवून फिर्यादी, तिची बहीण व आई यांचे अंगावरील सोन्याचे दागिने व घरातील पैसे जबरीने चोरून नेले. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

त्यानुसार , दिनांक १ मार्च रोजी पोलिसांचे पथक गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पथकास माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा बाबा आबा काळे (रा. लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता.वाशी, जि.धाराशिव) याने त्याच्या साथीदारांसह केला असून ते पुन्हा दुसरा गुन्हा करण्याकरीता जामखेड येथे येणार आहेत. तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून जामखेड ते खर्डा रोडवर, मारूती मंदिराजवळ सापळा लावून थांबलेले असताना संशयित वाहनांना थांबविले. त्यावेळी एका गाडीमधील इसम गाडीचा दरवाजा उघडून पळू लागले. त्यावेळी पथकातील अंमलदारांनी इसमांचा पाठलाग करून त्यातील तीन संशयित पकडले. त्यांच्याकडून एकुण १७,४५,०००रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

ताब्यातील संशयित आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी जामखेड पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास जामखेड पोलीस करीत आहेत. सदर कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, व विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT