Death Case  Pudhari
अहिल्यानगर

Jamkhed News: जामखेड-खर्ड्यात हृदयद्रावक घटना; आई व दीड वर्षीय मुलाचा विहिरीत मृतदेह

तरडगाव येथे खळबळजनक प्रकार; आत्महत्या की घातपात याबाबत पोलिस तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

जामखेड-खर्डा: तालुक्यातील तरडगाव येथे आई व तिच्या दीड वर्षीय मुलाचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. साळू शिवाजी चौरे (वय 23) व तिचा मुलगा विवांश शिवाजी चौरे (वय दीड वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना खर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

दत्तुबा ढाळे यांच्या विहिरीत सोमवारी (दि. 11) सकाळी अकराच्या सुमारास दोघांचे मृतदेह आढळले. मृतदेह विहिरीबाहेर काढून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

वंजारवाडी येथील बिभिषण तांदळे (वय 59) यांनी खर्डा पोलिसांत माहिती दिली की, त्यांची पुतणी साळू चौरे व नातू विवांश हे 10 मेपासून बेपत्ता होते. सोमवारी सकाळी तरडगाव येथील विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले.

प्राथमिक माहितीनुसार पहाटे 1 ते 3 वाजेदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत व सहायक फौजदार सय्यद यांनी पाहणी करून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून,

पुढील तपास सहायक फौजदार सय्यद करीत आहेत. दरम्यान, आईने मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली की या घटनेमागे घातपात आहे, याबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT