जामखेड: जामखेड (जि. अहिल्यानगर) नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पुढील पाच वर्षांच्या कालावधीत दरवर्षी एक अशा पद्धतीने एकूण पाच नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार पहिल्या वर्षासाठी उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून राळेभात पोपट दाजीराम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केली.
नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांनी या निवडणूक प्रक्रियेत एकत्रितपणे सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. उपनगराध्यक्षपदासाठी ठरविण्यात आलेली ही संधी-वाटपाची पद्धत नगरपालिकेतील समन्वय आणि सर्वसमावेशक नेतृत्वासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.