Murder Case Pudhari
अहिल्यानगर

Jamkhed Crime | जामखेड येथे चाकू-काठीने मारहाण करुन एकाचा खून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, एक आरोपी अटकेत

जामखेड पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जामखेड : तालुक्यातील फक्राबाद गावच्या शिवारातील झोपडपट्टी परिसरात शुक्रवारी (दि. १३ फेब्रुवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास झालेल्या मारहाणीच्या घटनेत एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये वैभव काळे या पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम सुर्यभान काळे (वय ५०, रा. फक्राबाद ता. जामखेड जि. अहिल्यानगर) यांना आरोपी सागर एकनाथ काळे, वैभव एकनाथ काळे व तुळसाबाई एकनाथ काळे (सर्व रा. फक्राबाद) यांनी लोखंडी चाकू व लाकडी काठीने मारहाण केली. या मारहाणीत तुकाराम काळे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेप्रकरणी राहुल तुकाराम काळे (वय २५, धंदा मजुरी, रा. फक्राबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८१/२०२६ भा.न्या.सं. कलम १०३, ३५२ आदीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविण लोखंडे व पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी करीत आहेत. सध्या परिसरात शांतता असून पोलिसांनी उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT