शनिशिंगणापूरमध्ये अलोट गर्दी; अमावस्येची पर्वणी साधत विकांनी घेतले शनिदर्शन Pudhari
अहिल्यानगर

Shani Shingnapur: शनिशिंगणापूरमध्ये अलोट गर्दी; अमावस्येची पर्वणी साधत विकांनी घेतले शनिदर्शन

पाच लाख भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले

पुढारी वृत्तसेवा

सोनई: शनिशिंगणापूर येथे अमावास्येनिमित्त भरलेल्या यात्रेस शुक्रवार सायंकाळ ते शनिवारपर्यंत पाच लाख भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. वाहन, दर्शनव्यवस्था, आरोग्य, रुग्णवाहिका, सुरक्षा, हरवले सापडले, पिण्याचे पाणी याचे नियोजन देवस्थानच्या वतीने करण्यात आले होते.

शुक्रवारी सायंकाळनंतरच भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. शनिवारी सकाळी गर्दी वाढल्यानंतर मुळा कारखाना गट ऑफिस परिसरात, घोडेगाव रस्त्यावरील शनैश्वर रुग्णालय येथे वाहनतळावरच भाविकांना वाहन पार्किंगला ठेवून दोन ते तीन किलोमीटर पायी जाऊन दर्शन घ्यावे लागले.  (Latest Ahilyanagar News)

शुक्रवारी दुपारी राकेश कुमार, जयेश शहा व सायंकाळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, सौरभ बोरा व शनिवारी दुपारी किशोर माठा व सायंकाळी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते आरती करण्यात आली. पद्मश्री पोपटराव पवार, आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन दर्शन घेतले.

देवस्थानच्या वतीने कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले, अध्यक्ष भागवत बानकर, चिटणीस आप्पासाहेब शेटे व विश्वस्त मंडळाने भाविकांचे स्वागत केले. शिंगणापूरचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके व देवस्थानच्या सुरक्षारक्षकांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT