श्रीगोंदा: राज्याच्या कानाकोपर्यातील शेकडो किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देतात. अलिकडच्या काळात या किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. राज्य सरकारने या किल्ल्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून गडकोट किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. रविवारी (दि.13) पेडगाव येथील धर्मवीर गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेसाठी जयंत पाटील आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खासदार नीलेश लंके, आमदार हेमंत उगले, माजी आमदार राहुल जगताप, राजेंद्र फाळके उपस्थित होते.
पाटील म्हणाले, धर्मवीरगडाचे संवर्धन करण्यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रायगडच्या पालकमंत्रीबाबत बोलताना ‘आदिती तटकरे यांना किती त्रास देणार’, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.