अहिल्यानगर

Harishchandragad Kokankada : शोधायला गेले मृतदेह सापडला सांगडा! कोकणकड्याच्या ८०० फुट खोल दरीत एक मृतदेह तर एका तरुणाचा सांगाडा!

गुजरातच्या विश्वराजसिह गोईलचा मृतदेह शोधण्यासाठी उतरलेल्या रेस्क्यू टिमला बेपत्ता असलेल्या पुण्याच्या गणेश सोनारचा सागांडा ; लोणावळा अँडवेनचर ट्रेकर्सची यशस्वी कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

अकोले : गड - किल्ले म्हणून पर्यटक स्थंळ असलेल्या हरिश्चंद्र गडावरील कोकण कड्याच्या सुमारे ८०० फुट खोल दरीत तरुणांचे मृतदेहाचे अवशेष आढळून आले आहेत. या दोनही तरुणांच्या मृतदेहाची ओळख राजूर आणि टोकावडे पोलिसांना पटलेली आहे. दरम्यान लोणावळा अँडवेनचर ट्रेकर्सच्या गणेश गिते यांच्या रेस्क्यू टीमने ही मोहीम फत्ते केली. मात्र शोधायला गेले एक मृतदेह अन सापडला एक सांगाडा, यामध्ये गुजरातच्या विश्वराजसिह गोईलच्या मृतदेहबरोबर पुण्याच्या बेपत्ता गणेश सोनारचा सांगाडा तर सापडल्याने अजूनही हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात बेपत्ता व्यक्तिचे सांगाडे सापडण्याची शक्यता आहे.

गुजरात येथील पालाताना येथे वास्तव्यास असलेला विश्वराजसिह मयुरसिंह गोईल वय २३ त्याचे आठ महिन्यापुर्वी लग्न झाले होते. तर पती - पत्नीतील वारवारं वाद होत असल्यामूळे तिला सासरचे घेऊन गेले होते. या गोईल याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर विश्वराजसिह याने घरी सांगितले कि, मी फिरुन येतो ,मात्र तो परत घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी पालीताना पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल केली होती.

परंतु सोमवारी दि.१२ ऑक्टोबर रोजी हरिश्चंद्र गडा वरील कोंकणकड्यावरुन "मी आत्महत्या करीत असल्याचा व्हिडीओ घरच्यांना टाकला होता. तसेच कोकणकड्यावर एका बॅगेत कपडे, चावी व मोबाईल आणि हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी मोटरसायकल आढळून आली होती. या अनुषंगाने गोईल कुटुंबियांनी राजूर पोलिस स्टेशनचे स.पो.नि.किशोर पवार, पो.काँ. लक्ष्मण मुठे व अभयारण्यातील वन कर्मचाऱ्यां समवेत बुधवार दि.१४ रोजी हरिश्चंद्रगड, कोकणकडा परिसरात विश्वराजसिह गोईलचा शोध घेतला असता कोकणकड्याच्या खाली ८०० फुट खोलवर दरीत एक प्रेत दिसून आले. दरम्यान शुक्रवारी टोकावडे पोलिस स्टेशनचे स.पो.नि.शितलकुमार नाईक, पो.हवालदार पाडुरंग बगाड,पो.काँ.वासुदेव सुरोसे आणि गणेश गिते यांच्या रेस्क्यू टीम ला बोलवण्यात आले. तर कोकण कड्यातील ८०० फुट दरीत दोरीच्या सहाय्याने उतरून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले.

यावेळी मृतदेह सापडल्यानंतर या टीमला एक जीर्ण झालेला सांगाडा आढळून आला, या सांगाड्याची जवळून पाहणी करत असताना टीमच्या सदस्यांना मोबाईल आढळून आला. हा सांगाडा पुण्याच्या बेपत्ता गणेश सोनारचा याचा असल्याची खात्री रेस्क्यू टिमने केली. यावेळी सांगाडा व मृतदेह रेस्क्यू टिमने वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये बांधून कोकणकड्या वरती आणली.

तसेच टोकवडे येथील स.पो.नि.शितलकुमार नाईक यांनी दुसऱ्या सागाड्याची ओळख सागाड्याजवळीक सापडलेल्या मोबाईल वरुन शोध घेतला असता गणेश जितेंद्र सोनार वय २६ रा. म्हाळुगे, जि.पुणे हा जुलै महिन्यात बेपत्ता असल्याची पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. या अनुषंगाने सागाड्याचे शवविच्छेदन करण्यात आले.तर अनुशेष नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

कोकणकडा बनले आत्महत्येचे केंद्रबिंदु ? हरिश्चंद्र गडावर कोकणकडयावरील ८०० फुट खोल दरीत सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता पर्यटकाचा शोध घेताना सिल्वासाचा रोहित सोळुंके आणि लांतुरचा गणेश होनराव या दोघा तरुणाचे सांगाडे आणि सांगाड्यातील फुट - दोन फुटाच्या अंतरावर हाडे तसेच मोबाईल कव्हर. रुमाल.वॉल्लेट. आधारकार्ड.पॅनकार्ड आढळून आले. तसेच आता पुण्याच्या गणेश सोनारचा सागाडा तर गुजरातच्या विश्वराजसिह गोईल चा मृतदेह आढळून आल्याने वर्षाभरात चार ते पाच जणांनी हरिश्चंद्र गडावरील कोकणकड्यावरुन आत्महत्या केल्याच्या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.यामुळे हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा आत्महत्येचे केंद्रबिंदू बनले असल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT