साईचरणी दीड कोटीची 'ॐ साई राम' सुवर्णाक्षरे अर्पण Pudhari
अहिल्यानगर

Sai Baba Gold: साईचरणी दीड कोटीची 'ॐ साई राम' सुवर्णाक्षरे अर्पण

या अक्षरांचे दोन सेट या भाविकाने साईचरणी अपर्ण केले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Devotees offer 1.5 crore worth golden letters Om Sai Ram at Shirdi

शिर्डी: एका भाविकाने साईबाबांवरील अपार श्रद्धा व्यक्त करण्यासाठी ‘ॐ साई राम’ या अक्षरांची भेट दिली आहे. मात्र, ही नुसती अक्षरे नाहीत तर ती सोन्यात बनवलेली अक्षरे आहेत. या अक्षरांचे दोन सेट या भाविकाने साईचरणी अपर्ण केले आहेत.

हा भक्त दुबईतील असून नेहमी साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतो. त्याला साईचरणी अनमोल दान देण्याची इच्छा होती. त्याप्रमाणे ‘ॐ साई राम’ हे शब्दांचे दोन सेट सोन्याचे तयार केले आणि साईचरणी त्यांची भेट दिली. (Latest Ahilyanagar News)

मात्र, त्याने नाव गुप्त ठेवण्याची अट टाकल्याने साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी त्याचे नाव सांगण्यास नकार दिला आहे. दुबईतील या भाविकाने तब्बल 1 किलो 623 ग्रॅम वजनाचे ‘ॐ साई राम’ या अक्षरांचे दोन सेट बनवले आहेत. त्यांची किंमत 1 कोटी 58 लाख 50 हजार रुपये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT