Ahilyanagar News Pudhari
अहिल्यानगर

Employee Harassment: अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून कंपनी कामगाराने संपवल जीवन; तीन आरोपींना अटक

एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांसह तीन जणांना अटक केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नगर: एमआयडीसीतील जी.के.एन कंपनीत या नामांकित कंपनीत कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ७ जुलै रोजी घडली. अधिकाऱ्यांच्या शारीरिक व मानसिक जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याच्या आरोपावरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांसह तीन जणांना अटक केली आहे.

सचिन आदिनाथ भदर्गे (रा. सावेडी, मूळ रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदा) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांची पत्नी कल्पना सचिन भदर्गे यांनी फिर्याद दिली.

तीत म्हटले आहे, की सचिन भदर्गे हे गेल्या २५ ते ३० वर्षांपासून जी. के. एन. सेंटर कंपनीत प्रामाणिकपणे मशीन ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. ७ जून २०२६ रोजी मध्यरात्री त्यांनी कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येनंतर सचिन भदर्गे यांच्या खिशात त्यांनी लिहिलेली चिठ्ठी (सुसाईड नोट) आढळून आली.

"आम्ही सगळेच इज्जतीत पैसा कमवायला काम करतो, पण इथे आम्हाला सारखं सारखं बेइज्जत केले जात आहे," असा उल्लेख करत कंपनीतील मानसिक त्रासामुळेच आत्महत्याचे पाऊल उचलत असल्याचे चिठ्ठीत स्पष्ट लिहिले आहे.

याप्रकरणी समीर शेवाळे (डिपार्टमेंट प्रमुख, जी.के.एन. सेंटर), पुरुषोत्तम ऋषी (प्लांट हेड), बाबासाहेब अर्जुन निर्मळ (जनरल सेक्रेटरी, वर्कर्स युनियन), विठ्ठल हंडोरे (उपाध्यक्ष, वर्कर्स युनियन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्यांत पोलिसांनी आरोपी समीर शेवाळे, पुरुषोत्तम ऋषी व बाबासाहेब निर्मळ यांना अटक केली आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज मोंढे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT