नगर: स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीजदरात सवलत मिळत असून महावितरणकडून एजन्सीच्या माध्यमातून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.
सोबतच रूफ टॉप सोलर उभारणार्या ग्राहकांना आवश्यक असणारे नेट मीटरसुद्धा मोफत लावण्यात येत आहेत. मीटरसाठी कुठल्याही शुल्काची मागणी केल्यास तक्रार करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणकडून स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहे. (Latest Ahilyanagar News)
त्यामुळे या नव्या मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड ग्राहकांवर नाही. घरगुती ग्राहकांकडे टीओडी मीटर असल्याशिवाय त्यांना दिवसाच्या वीजदरात असलेल्या सवलतीचा लाभ घेता येणार नाही.
त्यामुळे सदर टीओडी मीटर आणि रूफ टॉप सोलर उभारणार्या ग्राहकांना आवश्यक असणार्या नेट मीटर लावण्यासाठी कुणाकडूनही शुल्काची मागणी झाल्यास देऊ नये. यासंदर्भात ग्राहकांनी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा अथवा तक्रार करावी असे आवाहन महावितरणने केले आहे.