तहसीलदारांचे बनावट सही-शिक्के pudhari
अहिल्यानगर

तहसीलदारांचे बनावट सही-शिक्के ; राहुरीत बोगस ताबा पावत्या

पोलिसात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

राहुरी : तहसीलदारांच्या नावे बनावट सही, शिक्के व लेटरहेड बनविणार्‍या ठगाने महसूल प्रशासनाकडे वाहन ताबा देण्याचा बनावट आदेश काढला. दरम्यान, महसूल विभागाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

राहुरी महसूल कार्यालयात चक्क बनावट सही, शिक्का वापरलेले पत्र देत महसूल प्रशासनाला आदेश देणारे पत्र बनावट असल्याचे लक्षात येताच खळबळ उडाली. तहसीलदार नामदेव पाटील यांनाही आपल्या नावाची बनावट सही पाहून धक्काच बसला. त्यांनी पोलिस ठाणे गाठत त्या महाठगाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी तहसीलदार नामदेव पाटील यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत नमूद असे की, 21 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता अरुण नामदेव चव्हाण (वय 40) रा. वळण ता. राहुरी यांनी तहसील कार्यालयातून निर्गमित झालेल्या दोन ताबा पावत्या मो. नं 9284551157 यावरती मो.नं. 9923085022 यावरून प्राप्त झालेल्या पावत्या दर्शविण्यात आल्या. पावत्यांचे अवलोकन केले असता त्या दोघांनाही क्र. का. वि. / गौ. ख. / एस. आर. वाहन / 2024 राहुरी दि. 03/05/2024 असा त्यापैकी राहुल अंशाबापू पुंड रा. राहुरी बु., भैया अहमद शेख रा. राहुरी बु. ता. राहुरी यांच्या नावाच्या पावत्या त्यात ट्रेलर विना क्रमांक (कलर निळा पांढरा) तर दुसरी पावतीत टेम्पो विनाक्रमांक (निळा पांढरा) असे आशय असलेला मजकूर व वाहने ताबा देण्याचा आदेश होता. सदरच्या पावत्यांची शहानिशा केली असता पावत्यावर असलेली तारीख पाहिली असता 3 मे 2024 रोजी कोणताही वाहन ताबा आदेश झालेला नव्हता. व पावत्यात नमून असलेल्या कोणत्याही वाहनाचा लिलावात समावेश नव्हता. त्यानुसार मो.क्र. 9923085022 धारक इसमाने बनावट शिक्के, सही व बनावट राहुरी तहसीलदार नावाचा बनावट लेटर हेड बनवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबाबत अरूण चव्हाण यांनीही तक्रार अर्ज जोडला असून त्यानुसार पोलिस ठाण्यात राहुरी महसूल प्रशासनाला शेंडी लावण्याचा प्रयत्न करणार्‍या त्या मोबाईल क्रमांक धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाईल क्रमांकावरून पोलिस प्रशासनाला आरोपीचा शोध लावण्याचे आव्हान असून महसूल प्रशासनाला बनावट आदेशाद्वारे शेंडी लावण्याचा पराक्रम करणारा तो महाठग कोण? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT