महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांचे निधन  File Photo
अहिल्यानगर

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांचे निधन

कुलगुरूंच्या पश्चात त्यांची पत्नी व दोन मुले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे अल्पशा आजाराने दि. २९ जानेवारी, २०२५ रोजी पहाटे निधन झाले. कुलगुरूंच्या पश्चात त्यांची पत्नी व दोन मुले आहेत. त्यांचे असे अचानक जाण्यामुळे कृषि विद्यापीठामध्ये शोकाकुल वातावरण झाले आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा कुलगुरु पदाचा पदभार सांभळण्यापूर्वी त्यांनी मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (सिर्कोट) संचालक पदाची व तंत्रज्ञान हस्तांकरण प्रमुख ही महत्वाची पदे भुषवली आहेत. काही काळ त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथील प्रभारी कुलगुरू या पदाचा देखील कारभार सांभाळला होता.

कृषि क्षेत्रातील संशोधन व विस्तार उपक्रमातील सेवेचा त्यांना 33 वर्षांचा प्रदिर्घ अनुभव होता. 4 पुस्तके, 199 संशोधनात्मक पेपर, तांत्रिक शिक्षणासंबंधीची 14 पुस्तकेे व 1 पेटंन्ट त्यांच्या नावावर जमा आहे. राहुरी कृषि विद्यापीठांमध्ये कुलगुरु पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी सुयोग्य निर्णय घेऊन विद्यापीठाला शिक्षण, संशोधन व विस्तारत विद्यापीठाला नावलौकिक मिळवून दिले. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे विद्यापीठाला नुकताच उत्कृष्ट 'ए' ग्रेड मानांकन प्राप्त झाले आहे.

कर्मचारी, अधिकारी व शेतकऱ्यांच्या हिताचे बरेचसे निर्णय त्यांनी घेतले. यामध्ये विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकरिता कारकीर्द प्रगती योजना, 12/24 आश्वासित प्रगती योजना, कर्मचाऱ्यांच्या सोयीस्कर पदस्थापना, अनुकंप भरती, सेवानिवृत्त लाभ व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन, विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांची जाहिरात. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठामध्ये नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सुरू करण्यात आले.

कार्यतत्परशैली, पारदर्शकता व योग्य निर्णयासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांच्या या अचानक निधनामुळे विद्यापीठामध्ये शोकाकुल वातावरण झाले आहे. त्यांना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. साताप्पा खरबडे, संचालक संशोधन डॉ. विठ्ठल शिर्के, संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव डॉ. नितीन दानवले, नियंत्रक श्री. सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद डोखे यांनी तसेच विद्यापीठाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान, डॉ. पाटील यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी पुणे येथील कृषी महाविद्यालयातील जुनी शताब्धी इमारत येथे बुधवारी (दि. २९) सकाळी आठ वाजता आणण्यात आले. त्या ठिकाणी आयोजित शोकसभेत उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यसंस्कार त्यांच्या सांगली जिल्ह्यातील मूळ गावी कवठे एकंद (ता. तासगांव) येथे बुधवारी (आज) दुपारी २ :३० वाजता होणार असल्याचे कृषी विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT