राधाकृष्ण विखे-पाटील 
अहिल्यानगर

मंत्री राधाकृष्ण विखे यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी

मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून होणार सन्मान

पुढारी वृत्तसेवा

जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही मानाची पदवी देवून सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या 26 व्या पदवीदान समारंभामध्ये ही पदवी पदान केली जाणार आहे.

मंत्री ना. विखे पाटील यांनी शेती, सहकार, शिक्षण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेवून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. यापुर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मंत्री विखे पाटील यांना जीवन गौरव पुरस्काराने आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देवून सन्मानित केले होते

ना. विखे पाटील यांनी राजकीय, सामाजिक वाटचालीत अनेक महत्वपूर्ण पदावर काम करुन, सामाजिक हिताचे निर्णय घेतले. यामध्ये प्राध्यान्याने कृषि व पणन मंत्री असताना शेतकरी हिताच्या निर्णयांमुळे कृषि क्षेत्राला नवी दिशा मिळाली. शेतकरी ते ग्राहक ही योजना पहिल्यांदा राज्यात सुरु करुन शेतकर्‍यांच्या उत्पादीत मालाला नवी बाजारपेठ मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मुख्यमंत्री कौशल्य प्रशिक्षण योजना तसेच आचार्य चाणक्य कौशल्य प्रशिक्षण योजनेची सुरुवात त्यांनी प्रवरेच्या शिक्षण संस्थेतून सुरु केली. 35 प्रकारचे विविध कोर्सेस सुरु करुन, ग्रामीण भागातील युवकांना संधी निर्माण करुन दिली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी स्वतंत्र प्लेसमेंट सुविधा उपलब्ध करुन दिल्याने हजारो विद्यार्थी आज नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीसाठी पात्र ठरले आहेत. मोफत स्पर्धा परिक्षा केंद्र व पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र सुरु करुन, विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे. विखे पाटील परिवाराचे सामाजिक योगदानही मोठे असून, आरोग्य क्षेत्रामध्ये पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, प्रवरा मेडीकल ट्रस्ट या माध्यमातून समाजासाठी आरोग्याच्या सुविधाही त्यांनी निर्माण केल्या. जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून महिला बचत गटांची चळवळ सुरु करुन, ग्रामीण भागातील महिलांना स्वयं रोजगाराच्या संधी आणि लखपती दिदि योजनेतून अर्थसहाय्य करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांचा पुढाकार राहिलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मलाही डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देवून सन्मानित करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी विद्यापीठाच्या सर्व पदाधिकार्‍यांचा आभारी आहे. राजकीय, सामाजिक जीवनात मिळालेल्या संधीमधून समाजासाठी काम करीत आहे. लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळसाहेब विखे पाटील यांच्या विचारांचा वारसा घेवून शेती, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात अधिकचे काम करण्यासाठी हा मिळालेला सन्मान माझ्यासाठी ऊर्जा आहे.
ना. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री जलसंपदा विभाग.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT