राहुरी फॅक्टरी : छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासलं, महिलांवर अन्याय होऊ नये यासाठी संरक्षण दिल, अठरा पगड जातीला सोबत घेऊन न्याय दिला. छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे होते असे प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.
राहुरी फॅक्टरी येथील चोथे वस्ती येथील साई पारायण सोहळ्याची शिवजयंतीदिनी महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली. प्रसंगी ते बोलत होते.
उद्धव महाराज म्हणाले की, अण्णासाहेब चोथे व परिवाराची साई बाबांवर नितांत श्रध्दा असून दरवर्षी अन्नदान व ज्ञानदानाचे कार्य साई पारायण सोहळ्याच्या माध्यमातून सुरू आहे.साई मंदिर उभारणीचे काम प्रगतीपथावर असून कलशाचे काम हे सर्वांनी मिळून व्हावे यासाठी सर्वांनी आर्थिक हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले. या कीर्तनानंतर हजारो भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.
कार्यक्रमास ह.भ.प सीताराम ढुस, प्राध्यापक सतीश राऊत, आदर्श पतसंस्थेचे चेअरमन प्राध्यापक सुधाकर कदम, व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज, तनपुरे कारखान्याचे माजी संचालक मच्छींद्र तांबे, अशोक खुरुद, माजी उपनगराध्यक्ष सुखदेव मुसमाडे,अनंत कदम, राहुरी निधीचे रामभाऊ काळे, माजी नगरसेवक बाळासाहेब खुरुद, संदीप मुसमाडे, सुजाता कदम, भाऊसाहेब मुसमाडे, राजेंद्र सोळुंकी, मेजर राजेंद्र कडू, प्रभाकर कर्पे, किशोर वरघुडे, दत्तात्रय रोडे, अशोक उरहे, सिद्धार्थ वाबळे, अशोक मुसमाडे , सुनील भांड, मारुती खरात आदिंसह भाविक भक्तगण मोठ्या संख्यने उपस्थित होते.आभार माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोहळा यशस्वीतेसाठी चोथे वस्तीवरील साई भक्त, गणपती चौक भजनी मंडळ, शेटेवाडी महिला भजनी मंडळ, जय मातादी मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, तुळजा भवानी मित्र मंडळ , भारत चोथे मित्र मंडळ, आदर्श नागरी सहकारी पतसंस्था, संकल्प पतसंस्था कर्मचारी व अधिकारी यांनी परिश्रम घेतले.