अकोले: पुढारी वृत्तसेवा सासरच्या जांचाला कंटाळून विवाहितेने राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना अकोले तालुक्यात घडली. पोलिसांनी याप्रकरणी सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आकांक्षाअसे मयत विवाहितेचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, आकांक्षा हीचा विवाह शुभम गोरख परासूर याच्यासोबत झाला होता. मात्र आकांक्षा हिचा सासरी छळ होत असल्याने तीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मयत आकांक्षाच्या आई सुनिता दादाभाऊ सांगडे (वय 47 रा.शेडगाव ता.संगमनेर) यांनी अकोले पोलिसांत दिली आहे. (Latest Ahilyanagar News)
त्यावरून पोलिसांनी कानिफनाथ गोरख परासुर (दीर), वर्षा कानिफनाथ परासुर (जाऊ), शुभम गोरख परासुर (पती) रा. आंबेडकर नगर अकोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक खांडबहाले करीत आहे.