राहुरी: राहुरी तालुक्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या डॉ. तनपुरे कारखान्यासाठी शासनाकडून हवी ती मदत करण्याचा मानस आहे. मागिल काळात चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता दिल्याने कारखान्याचे वाटोळे झालेले आहे.
तनपुरे कारखाना मी चालवायला घ्यावा अशी मागणी होती. परंतु मी तनपुरे कारखाना चालविण्यास घेणार नाही. केंद्र व राज्य शासनाकडून मोठी मदत मिळवून देणार असून कारखान्याच्या संचालकांनी काटकसरीने कारखाना चालवावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. (Latest Ahilyanagar News)
राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन व उपहार गृहाचे उद्घाटन तसेच कार्यकर्ता मेळाव्यासाठी उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला. अध्यक्षस्थानी अॅड. केरू पानसरे हे होते. या कार्यक्रमाला आमदार काशीनाथ दाते, माजी आमदार लहू कानडे, कैलास पाटील, डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अॅड. केरू पानसरे, बाजार समितीचे सभापती अरुणराव तनपुरे, हर्ष तनपुरे, राजेंद्र नागवडे, अशोक सावंत, कपिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, तुम्ही कारखान्याचे मालक आहात. कारखान्यात तुम्ही चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता दिली.त्यामुळे प्रश्न गंभीर बनला आहे. हा कारखाना मी चालविण्यासाठी घ्यावा अशी मागणी केली जात आहे. मात्र मी ती मान्य करु शकत नाही.
एकरकमी तसेच शासकीय पातळीवर मदतीचा प्रस्ताव करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. आम्ही शक्य ती सर्व मदत करु. केंद्र व राज्य सरकार दोन्हीही मदत करतील, अशी ग्वाही देतानाच सभापती अरुण तनपुरेंच्या नेतृत्वाखालील बाजार समिती राज्यात पहिल्या दहा समित्यात आहे. समित्यांच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकार मोठा निधी उपलब्ध करून देणार आहे. मी कामाचा माणूस.
कारखाने अडचणीत आले जिल्हा बँक शेतकर्यांची बँक आहे. एआय तंज्ञानाचा अवलंब करुन शंभर टन एकरी ऊस उत्पादन निघते. व्यापारी पध्दतीने संस्था चालवली पाहिजे. दीड कोटी रुपये खर्च करुन उपहारगृह उद्घाटन आज होत आहे.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकर्यांनी केला पाहिजे. आँनलाईन मोंढा यामुळे बाजारपेठेत विस्तारित होईल.अद्ययावत जिनिंग सुरू करण्याचा बाजारसमितीचा मानस आहे. अरुण तनपुरेंच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांची सर्व विकास कामे विकासनिधीतून केली.19कोटींच्या समितीकडे ठेवी आहेत. राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे.
पुणे-अहिल्यानगर रेल्वे सुरू करणार: पवार
केंद्र शासनाने पुणे-अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गास मंजुरी दिली असून, भूसंपादन प्रक्रियेद्वारे शेतकर्यांच्या जमिनी संपादित करण्यात येणार आहे. त्यांना योग्य मोबदला देण्यात येईल. या मार्गामुळे शेतमालाची वाहतूक सुलभ होणार आहे. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुढील 6 महिन्यात सुतगिरणीचा शुभारंभ: तनपुरे
सभापती अरुण तनपुरे यांनी बाजार समितीच्या कामकाजाचा सारांभ मांडला. 19 कोटीची ठेव असलेली राहुरी बाजार समितीने कोणत्याही कर्जाशिवाय शेतकर्यांना वेगवेगळ्या सोय सूविधा उपलब्ध करून दिल्या. जनावरांच्या बाजारासाठी जागा खरेदी करून त्याचा शुभारंभ झाला आहे. फळ बाजारासाठी बाजार पेठ उपलब्धतेचा शब्द आहे. तसेच आगामी 6 महिन्यात बाजार समिती मार्फत सुत गिरणी प्रारंभ करणार असून त्यासाठी उपमख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा यावे, असे तनपुरे यांनी सांगितले. प्रस्ताविक हर्ष तनपुरे यांनी केले. आभार सचिव बी. जरे यांनी मानले.