AI people counting at Shirdi Temple
नगर: ‘एआय’ आधारीत शिर्डीतील पिपल काऊंटिंग प्रणालीचा प्रारंभ साईबाबा संस्थानकडून गुरुवारी केला. दर्शन रांगेतील कॅमेऱ्याच्या माध्यमातून भाविकांची मोजदाद शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाणार आहे. संशयास्पद हालचालींची माहिती तत्काळ सुरक्षा विभागाला मिळणार असल्याने सुरक्षेचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे. काही काळानंतर अख्ख्या शिर्डीतील कॅमेरे या तंत्रज्ञानाशी जोडले जाणार आहेत.
भाविकांच्या सुरक्षेसोबतच दर्शन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रिझमा एआय कंपनीच्या देणगीतून ही सुविधा संस्थानला उपलब्ध झाली आहे. (Latest Ahilyanagar News)
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर कंपनीचे अध्यक्ष डॉ. श्रीराम अय्यर यांच्या हस्ते प्रणालीचा प्रारंभ गुरुवारी करण्यात आला. या नवीन प्रणालीद्वारे मंदिर परिसरातील प्रमुख प्रवेशद्वारांवरून येणाऱ्या भाविकांची अचूक नोंद होणार आहे. दर्शनानंतर ‘मुखदर्शन आऊट’ व ‘बुंदी प्रसाद आऊट’ येथेही भाविकांची मोजदाद होईल.
संशियतांच्या सूचनेमुळे सुरक्षेला बळकटी!
प्रणालीत फेस डिटेक्शन तंत्रज्ञानाचाही समावेश असून, संशयित अथवा गुन्हेगारांचे फोटो पूर्वनियोजित पद्धतीने डेटाबेसमध्ये अपलोड केले जातील. अशा व्यक्तींची उपस्थिती आढळल्यास सुरक्षा यंत्रणेला तत्काळ सूचना मिळणार आहे. त्यामुळे त्वरित कारवाई करता येणार असल्याने मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.