Ahilyanagar Municipal Corporation Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Municipal Power Sharing Formula: महापालिकेत सत्तावाटप निश्चित; महापौर राष्ट्रवादीकडे तर उपमहापौर भाजपकडे

स्थायी समिती भाजपच्या ताब्यात; स्वीकृत नगरसेवक व समिती सदस्यांची नावे आज विशेष सभेत जाहीर होणार

पुढारी वृत्तसेवा

नगर: महापालिकेतील सत्तेचे वाटप सूत्र बुधवारी रात्री समोर आले. उपमहापौरासह स्थायी समितीचे सभापती भाजपकडे तर महापौर व महिला बालकल्याण समिती राष्ट्रवादीकडे असणार आहे. दरम्यान बुधवारी रात्री राष्ट्रवादीकडून स्वीकृत नगरसेवकांची नावे तसेच स्थायी व मबाक समितीची नावे निश्चित करण्यात आली.

आ. संग्राम जगताप यांचे कुटुंब प्रथमच सार्वत्रिक निवडणुकी लढविण्यापासून दूर राहिले. महापालिकेत जगताप कुटुंबापैंकी कोणीतरी एक असावे अशी मागणी कार्यकर्त्यांकडून पुढे आल्यानंतर विकी जगताप यांचे नाव स्वीकृतसाठी निश्चित केल्याचे समजते. बोल्हेगावातून निसटत्या मतांनी पराभूत झालेले बाबासाहेब नागरगोजे आणि माजी नगरसेवक दगडूमामा पवार यांच्या नावावर स्वीकृत म्हणून निश्चित झाल्याचे सूत्रांकडून समजले.

दरम्यान महिला बालकल्याण समितीसाठी पाच महिलांची तर स्थायीसाठी 9 नावे राष्ट्रवादी नगरसेवकांची बैठकीत निश्चित करून ती मुंबईत आ. संग्राम जगताप यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहेत. स्थायीसाठी इच्छुकांतून दोघांना वगळले जाणार आहे. ते कोण? हे आज गुरूवारी सभेत समोर येईल. तर महिला बालकल्याण समिती सभापती निवडीला अवकाश असला तरी मनिषा बारस्कर, मीना चोपडा व अनिता विपुल शेटिया यांच्यातून एकीला सभापती पदाची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले.

स्थायी समिती सदस्य, महिला व बालकल्याण समिती सदस्य व स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी आज गुरूवारी विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. स्थायी समितीचे 16 आणि महिला व बालकल्याण समितीचे 16 सदस्य तसेच स्वीकृत नगरसेवकांची सहा सदस्यांची निवड होणार आहे.

भाजपाला स्वीकृतच्या दोन जागा मिळणार असून, त्यासाठी भाजप माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर, मनिषा काळे, रामदास आंधळे यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेचा एक स्वीकृत नियुक्त केला जाणार असून जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, माजी शहरप्रमुख सचिन जाधव, माजी नगरसेवक दिलीप सातपुते, उद्योजक दत्तात्रय जाधव यांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान स्थायीमध्ये काँग्रेस एमआयएमची एंट्री होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT