Ahilyanagar Municipal Budget 2026 Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Municipal Budget 2026: अहिल्यानगर महापालिकेचे 1710 कोटींचे बजेट; नव्या कामांना ब्रेक

30 कोटींची वाढ, पण जुन्याच प्रकल्पांवर भर; उत्पन्न वाढीसाठी मालमत्ता सर्वेक्षणावर लक्ष

पुढारी वृत्तसेवा

नगर: महापालिकेच्या गतवर्षीच्या अंदाजपत्रकापेक्षा 30 कोटींची वाढ असलेले यंदाचे 1710 कोटींचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे यांच्याकडे मंगळवारी (दि. 17) सादर केले. त्यात नव्याने कोणतेही काम प्रस्तावित नाही. सर्व जुनीच कामे करण्यावर भर देण्यात आला आहे. स्थायी समितीने अभ्यासासाठी एक दिवस वेळ मागितला असून, उद्या या बजेटवर चर्चा होणार आहे.

महापालिका स्थायी समितीची सभा सभापती सुभाष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समिती सदस्य बाबासाहेब वाकळे, निखील वारे, मनोज कोतकर, सुरेश बनसोडे, मनोज दुलम, नवनाथ कातोरे, संध्या पवार, गौरी बोरकर, हरप्रीतकौर, मीना चोपडा, पौर्णिमा गव्हाळे, सुनीता गेणप्पा, शेहनाज शेख, मिनाज खान, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर, मुख्य लेखाधिकारी तथा उपायुक्त मेहेर लहारे, उपायुक्त शहाजहान तडवी, लेखापरीक्षक गणेश लयचेट्टी, लेखा विभागाचे अनिल लोंढे आदी उपस्थित होते.

महापालिकेची निवडणूक नुकतीच होऊन प्रशासकाच्या हाती असलेला कारभार लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या हाती आल्यानंतर पहिलेच अंदाजपत्रक आयुक्त डांगे यांनी सादर केले. गतवर्षीपेक्षा 30 कोटींची वाढ अर्थसंकल्पात दाखविली आहे. त्यात महसुली उत्पन्न 481 कोटी 4 लाख तर, भांडवली जमा 1161 कोटी 42 लाख नमूद केले आहे. दरम्यान, महसुली उत्पन्नामध्ये संकलित करात अवघी 75 लाखांची वाढ दाखविली आहे. जीएसटी अनुदानामध्येही सुमारे 11 कोटींची वाढ असून, पाणीपट्टीच्या उत्पन्नातही 3 कोटींची वाढ दर्शविली आहे. गतवर्षी 1680 कोटींचे अंदाजपत्रक सादर झाले होते. यंदा त्यात वाढ करून 1710 कोटींचे करण्यात आले. त्यात सुरू असलेली कामे पूर्णत्वास नेणे व नवीन कामांसाठी शासनस्तरावर प्रयत्न करून जास्तीत जास्त निधी मिळवून शहराचा विकास करणे, त्याचप्रमाणे मालमत्तांचे सर्वेक्षण करून घरपट्टी आकारणी करून उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे आयुक्त डांगे यांनी सांगितले.

उत्पन्न

  • संकलित करापोटी 103 कोटी 80 लाख

  • संकलीत करावर आधारीत 89 कोटी 70 लाख

  • जीएसटी अनुदान 151 कोटी 92 लाख

  • इतर महसुली अनुदान 17 कोटी 27 लाख

  • गाळा भाडे 3 कोटी 93 लाख

  • पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न 33 कोटी

  • मीटरद्वारे पाणी पुरवठ्यापोटी 20 कोटी

  • इतर उत्पन्न 42 कोटी 39 लाख

  • भांडवली उत्पन्न 1161 कोटी 42 लाख

खर्च

  • वेतन, भत्ते व मानधनावर 161 कोटी 90 लाख,

  • पेन्शन, सेवा उपदान 71 कोटी 50 लाख,

  • पाणी पुरवठा विज बिल 45 कोटी,

  • स्ट्रीट लाईट विज बिल 8 कोटी,

  • शिक्षण विभाग वेतन हिस्सा 6 कोटी 50 लाख,

  • महिला व बाल कल्याण योजना 2 कोटी 55 लाख,

  • अपंग पुनर्वसन योजना 2 कोटी 55 लाख,

  • मागासवर्गीय कल्याणकारी योजना 8 कोटी 41 लाख,

  • सदस्य मानधन 63 लाख,

  • औषधे व उपकरणे 1 कोटी 70 लाख,

  • सदस्य प्रभाग स्वेच्छानिधी 9 कोटी 62 लाख,

  • कचरा संकलन व वाहतूक 20 कोटी,

  • पाणी पुरवठा साहित्य खरेदी व

  • दुरुस्ती 1 कोटी 25 लाख,

  • टँकरद्वारे पाणीपुरवठा व ब्लिचिंग

  • पावडर खरेदी 2 कोटी 75 लाख,

  • अशुध्द पाणी आकार 5 कोटी,

  • अग्निशमन वाहने खरेदी 3 कोटी,

  • नवीन रस्ते 1 कोटी 50 लाख,

  • रस्ते दुरुस्ती 1 कोटी 50 लाख,

  • इमारत दुरुस्ती 75 लाख,

  • शहरातील ओढ नाले साफसफाई 55 लाख,

  • आपत्कालीन व्यवस्थापन 50 लाख,

  • कोडवाड्यावरील खर्च 12 लाख,

  • वृक्षारोपण तदनुषंगिक खर्च 1 कोटी,

  • हिवताप प्रतिबंधक योजना 60 लाख,

  • कचरा डेपो सुधारणा व प्रकल्प उभारणी 1 कोटी

  • मोकाट कुत्री व जनावरे बंदोबस्त 1 कोटी 40 लाख

  • मालमत्ता सर्वेक्षण 10 कोटी,

  • मृत जनावरे विल्हेवाट प्रकल्प 55 लाख,

  • पुतळे बसविणे 1 कोटी,

  • भविष्य निर्वाह निधी तूट 1 कोटी,

  • बेवारस प्रेत विल्हेवाट 25 लाख,

  • उद्यान दुरुस्ती 20 लाख

सरकारी योजना

मूलभूत सुविधा विकास, दलितेतर वस्ती सुधारणा, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान, अल्पसंख्याक विकास निधी, 15 वा वित्त आयोग, सर्वासाठी घरे निधी, दलित वस्ती सुधारणा, पर्यटनासाठी पायाभूत सुविधा निधी, पाणीपुरवठा निधी, रस्ते सुरक्षा, शहर सौंदर्यीकरण पारितोषिक, जिल्हा ग्रंथालय इमारत बांधणे, ई बस सेवा केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबडेकर सामाजित विकास योजना.

निधी आणि कामे

  • सीना नदी खोलीकरण व रुंदीकरण 20 कोटी

  • प्रधान मंत्री आवास योजना

  • कचरा डेपोत मान्सूर शेड 7 कोटी 58 लाख

  • नेहरू मार्केट नूतन इमारत 8 कोटी 9 लाख

  • रंगभवन शॉपिंग कॉम्पलेक्स पार्किंग 28 कोटी

  • प्रोफेसर चौक शॉपिंग कॉम्पलेक्स 35 कोटी

  • उपनगरात भूमिगत गटार योजना 600 कोटी

  • पीएम ई बस योजनेसाठी 12 कोटी

पाणी योजनेसाठी कर्ज

महापालिकेने यापूर्वीच 450 कोटींची पाणी योजना राज्य सरकारकडे प्रस्तावित केली आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही. मात्र, महापालिका केंद्राच्या यूआयडीएफकडून स्वहिस्सा भरण्यासाठी 150 कोटींचे कर्ज घेणार आहे.

दोन हजार कोटींची मागणी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने पिंपळगाव माळवी येथे थीम पार्क तयार करण्यात येणार आहे. तसेच, पाणी योजनेसह अन्य योजनांसाठी राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे दोन हजार कोटींची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डांगे यांनी दिली.

चांगल्या दर्जाचे रस्ते, मूलभूत आरोग्य सेवा, स्ट्रीट लाईट, शुध्द व मुबलक पाणी, निरोगी आरोग्य या चांगल्या दर्जाच्या सेवा देण्यासाठी महानगरपालिका बांधील आहे. त्याचप्रमाणे शहरात विविध योजना राबवून मनपाचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
यशवंत डांगे, आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT