Video viral blackmailing case  
अहिल्यानगर

Blackmail Case: ब्लॅकमेल करून तरुणीवर अत्याचार; खोटे मॅरेज सर्टिफिकेट छापून लग्नही मोडले

संगमनेरात तरुणाविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: ब्लॅकमेल करून महाविद्यालयातील तरुणीवर अत्याचार केला आणि खोटे मॅरेज सर्टिफिकेट तयार करून तिचे लग्नही मोडणाऱ्या तरुणाविरुद्ध मुलीच्या नातेवाइकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकरंद संजय गोडगे (रा. चिंचोली गुरव) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, की एक तरुणी शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. इन्स्टाग्रामवर तिची गोडगेशी ओळख झाली. त्याचा गैरफायदा घेत त्याने तरुणीसोबत फोटो काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला.

दरम्यान, सदर मुलगी सुटत गावी गेली असता तेथेही त्याने त्रास दिला. सुटी संपल्यानंतर तरुणी पुन्हा शहरात आली. यावेळी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीच्या मामालाही त्याने दमबाजी केली.

पीडितेच्या नातेवाइकांनी हे सर्व प्रकार शहर पोलिसांना सांगितले. त्यानंतर आरोपी मकरंद संजय गोडगे याच्याविरुद्ध येथील शहर पोलिस ठाण्यात अत्याचारासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीचे लग्न मोडले

दरम्यान, पीडित तरुणीचे लग्न जमले होते. तेव्हा आरोपीने संबंधित वराच्या नातेवाइकांना सांगितले की, हिचे आणि माझे प्रेमसंबंध आहेत. आम्ही रजिस्टर लग्न केले आहे. मित्रांना फोनवर रजिस्टर लग्न झाल्याचे बनावट कागदपत्र टाकून आरोपीने पीडित मुलीचे लग्न मोडल्याचेही पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT