घारगाव: व्यसनी व्यक्तीने घेतलेली रक्कम मागण्याच्या बहाण्याने आलेल्या एकाने त्याच्या 26 वर्षीय विवाहितेवर अंगणातच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागात घडली. किसन देवराम गफले असे आरोपीचे नाव असून घारगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पठार भागातील एका वाडीवर रविवारी (दि.10) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. पोखरी बाळेश्वर परिसरात राहणार्या किसन याचा एका वाडीवर राहणार्या एका व्यसनी तरुणाशी आर्थिक व्यवहार होता. त्याच्या वसुलीसाठी तो तरुणाच्या घरी जात होता. व्यसनाधीनतेमुळे संबंधित तरुणाकडून पैशांची परतफेड झाली नव्हती. किसन त्याच्या घरी चकरा मारत असताना त्याची नजर तरुणाच्या 26 वर्षीय पत्नीवर होती. (Latest Ahilyanagar News)
रविवारी रात्री किसन पैसे मागण्याच्या बहाण्याने तरुणाच्या घरी गेला. तेव्हा त्याची पत्नी घरात एकटीच होती. किसनने तिला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती घराबाहेर पळाली. मात्र त्याने घराबाहेर अंगणात पकडून तिच्यावर अत्याचार केला.
कोणाला सांगितल्यास तुझ्यासह तुझ्या नवर्याकडे पाहून घेईन, अशी धमकी देऊन निघून गेला. त्यानंतर काही वेळाने पीडितेचा मोठा दीर दारूच्या नशेत असलेल्या तिच्या पतीला घेऊन घरी आला. त्यांना सांगितला. त्याची तक्रार सोमवारी सायंकाळी पोलिसात दाखल करण्यात आली.पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक केली.