श्रीरामपूर: महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 12 जून 2025 च्या आदेशान्वये श्रीरामपूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 4 गटात 4 सदस्य, तर पंचायत समितीच्या 8 गणांमध्ये 8 सदस्य अशी सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या 4 गटांमध्ये बेलापूर, उंदिरगाव, टाकळीभान व दत्तनगर असे चार गट, तर पंचायत समितीच्या निमगाव खैरी, उंदिरगाव, दत्तनगर, उक्कलगाव, बेलापूर बुद्रुक व पढेगाव असे 8 गण निश्चित करण्यात आले आहेत.
उंदिरगाव गटात निमगाव खैरी व उंदिरगाव हे दोन गण समाविष्ट करण्यात आले आहेत. निमगाव खैरी गणात निमगाव खैरीसह महांकाळ वडगाव, माळेवाडी, मातुलठाण, रामपूर, जाफराबाद, सराला, नाऊर, नायगाव, गोंडेगाव, गोवर्धनपूर, तर उंदिरगाव गणामध्ये उंदिरगावसह माळवडगाव, हरेगाव, मुठेवडगाव, घुमणदेव, भामाठाण, खानापूर व कमालपूर या गावांचा समावेश करण्यात आला आहे. (Latest Ahilyanagar News)
दत्तनगर गटामध्ये दत्तनगरसह उक्कलगाव असे दोन गण, दत्तनगर गणामध्ये दत्तनगर, शिरसगाव, दिघी, ब्राह्मणगाव वेताळ, भैरवनाथनगर, तर उक्कलगाव गणामध्ये उक्कलगावसह मांडवे, एकलहरे, फत्याबाद, कुरणपूर, खंडाळा, गळनिंब व कडीत खुर्द या गावांचा समावेश करण्यात आला आहे.
बेलापूर गटामध्ये बेलापूर व पढेगाव हे दोन गण आहेत. बेलापूर गणामध्ये बेलापूर बुद्रूक, ऐनतपूर, बेलापूर खुर्द, नर्सरी व वळदगाव, तर पढेगाव गणामध्ये पढेगाव, मालुंजा बुद्रूक, खिर्डी, लाडगाव, भेर्डापूर, कान्हेगाव, उंबरगाव, वांगी बुद्रुक व वांगी खुर्द या गावांचा समावेश करण्यात आला आहे.
गणांमध्ये मोठ्या गावांचा समावेश
टाकळीभान गटामध्ये टाकळीभान व निपाणी वडगाव या दोन गणांचा समावेश झाला आहे. टाकळीभान गणामध्ये टाकळीभानसह कारेगाव, खोकर व भोकर या मोठ्या गावांचा समावेश आहे. निपाणी वडगाव गणामध्ये वडाळा महादेव, निपाणी वडगाव व मातापूर या गावांचा समावेश आहे.