उत्तर महाराष्ट्र

नाशिकच्या विद्यार्थ्याने शोधला स्नॅपचॅटमध्ये बग

गणेश सोनवणे

नाशिक : मेट भुजबळ नॉलेज सिटीतील डिप्लोमा थर्ड इयर आयटीमधील विद्यार्थी विशाल सटले याने सोशल माध्यमातील स्नॅपचॅट या अॅप्लिकेशनमध्ये बग एरर शोधून काढला आहे. यासंदर्भातील बग स्वीकृती दर्शक ई-मेल विद्यार्थ्यास प्राप्त झाला आहे.

मेट पॉलिटेक्नीकचा हा विद्यार्थी सामंजस्य करारांतर्गत सायबर संस्कार या सायबर सेक्युरिटी देणाऱ्या नामांकीत संस्थेत औद्द्योगिक प्रशिक्षण घेत असून, त्याअंतर्गत या विद्यार्थ्याने हा सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा बग शोधण्याची कामगिरी करून दाखवली आहे. साधारणपणे या बगमुळे समोरच्या युजरने पाठवलेला फोटो हा स्क्रीन शॉटद्वारे आपल्याकडे ठेवू शकतो. व समोरच्या व्यक्तीला काही कळणार नाही. त्यामुळे प्रायव्हसी ब्रेक होते, असे या बगचे स्वरूप आहे.

सायबर संस्कारचे संचालक डॉ. तन्मय दीक्षित यांचे याकामी मार्गदर्शन विद्यार्थ्यास लाभले. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीसाठी मेट भुजबळ नॉलेज सिटीचे विश्वस्त समीर भुजबळ, प्राचार्य डॉ. राजेंद्र नारखेडे, विभाग प्रमुख संजीव पाटील, टीपीओ प्रा. उमेश पाठक व प्रा. अनिल गोसावी आदींनी अभिनंदन केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT