पुढारी ऑनलाईन डेस्क :
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी १ डिसेंबर रोजी जाहीर केल्या. यामध्ये पक्षाच्या मुख्य प्रतोदापदी रोहित पाटील यांची निवड झााली आहे. तर विधीमंडळ गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होतो. याच पार्श्वभूमीवर आता पक्षामध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र असलेले रोहित पाटील पहिल्यांदाच विधानसभेमध्ये गेले आहेत. या तरुण नेत्यावर आता पक्षाने आता मोठी जबाबदारी दिली आहे.
जयंत पाटील यांनी पुढे बोलताना लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. लाडक्या बहिणींमुळे महायुतीला यश आले आहे. तर नवीन सरकारने ६५ वर्षांवरील वयाच्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असेही म्हटले आहे.