मुंबई

‘हॉटशॉट’ वर कारवाई झाल्यास कुंद्राकडे तयार होता प्लॅन बी

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : अ‍ॅडल्ट कंटेंट असणारे 'हॉटशॉट' अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून केव्हाही हटविले जाऊ शकते, याची आधीपासून कल्पना असलेला राज कुंद्रा प्लॅन बीवर काम करीत होता. 'बॉली फेम' नावाने 'हॉटशॉट'सारखे दुसरे अ‍ॅप आणण्याची त्याची तयारी सुरू होती, अशी खळबळजनक माहिती व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून उघडकीस आली आहे.

पोर्नोग्राफीप्रकरणी अटकेत असलेल्या कुंद्राने तयार केलेल्या एच अकाऊंट नामक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील चॅटिंग व्हायरल झाले आहे. 'हॉटशॉट' अ‍ॅपद्वारे कुंद्राला चांगली कमाई होत होती. 18 नोव्हेंबरला नियमांच्या उल्लंघनप्रकरणी गुगलने 'हॉटशॉट' अ‍ॅपवर कारवाई केली.

त्यासंदर्भात प्रदीप बक्षी नावाच्या व्यक्‍तीने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर गुगल प्ले स्टोअरने दिलेला रिव्ह्यू शेअर केला होता. त्यावर व्यक्‍त होताना राज कुंद्रा म्हणतो की, ते ठीक आहे. आपला प्लॅन बी तयार आहे. पुढील 2-3 आठवड्यांत नवीन अ‍ॅप सुरू होईल. हे अ‍ॅप आयओएस तसेच अँड्रॉईड दोन्हीमध्ये काम करेल.

नवीन अ‍ॅप लाँच होईपर्यंत अ‍ॅपवरील अ‍ॅडल्ट कंटेंट हटवून गुगलकडे अपील करता येईल, असे 'हॉटशॉट'चे डिजिटल मार्केटिंग करणार्‍या रॉब नावाच्या व्यक्‍तीने या चॅटदरम्यान सुचविले होते.

त्यावर 'बॉली फेम' सुरू होईपर्यंत 'हॉटशॉट' कसे टिकवून ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज कुंद्राने व्यक्‍त केली. विशेष म्हणजे, 'हॉटशॉट' पूर्ववत सुरू करण्याची विनंती गुगलने फेटाळली होती, असे प्रदीप बक्षीने या चॅटमध्ये म्हटले आहे.

10 नोव्हेंबर 2020 च्या चॅटमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कारवाईबद्दल बोलताना थँक गॉड तुम्ही 'बॉली फेम'ची तयारी केली, अशा मजकुरावर कुंद्राने संबंधिताला सध्या तरी ओटीटीवरून अ‍ॅडल्ट कंटेंट हटवा, कार्यालयात पोहोचून सविस्तर बोलू, असा रिप्लाय दिला आहे.

लाईव्ह कंटेंट

* चॅटमध्ये राज कुंद्राने दिलेल्या रिप्लायनंतर एक व्यक्‍ती म्हणते आहे की, भविष्यात लाईव्ह कंटेंटला महत्त्व असून, यात स्क्रीन रेकॉर्ड करता नाही आली, तर अशात फिल्म चालवूनही काही फरक पडणार नाही. जुना कंटेंट विकून टाकू, जेणेकरून 50 लाख वसूल होतील.

* कुंद्राने इंग्लंडमधील कायद्यांवर आधारित नव्या अ‍ॅपसाठी 7+, 12+, 16+ आणि 18+ वयोगटातील कंटेंट तयार करण्याची योजना तयार केली होती, असेही या चॅटमधून समोर आले आहे.

* अ‍ॅडल्ट कंटेंटमुळे अ‍ॅप पूर्ववत करण्याची विनंती गुगलने फेटाळली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT